पिचडांची पिलावळ मला बदनाम करते, त्यांची लायकीच नाही : आमदार लहामटे - I am disgraced by the pitching of pitches, they are not worthy: MLA Lahamate | Politics Marathi News - Sarkarnama

पिचडांची पिलावळ मला बदनाम करते, त्यांची लायकीच नाही : आमदार लहामटे

मुरलीधर कराळे
रविवार, 19 जुलै 2020

आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याबाबत `सरकारनामा`शी बोलताना त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली.

नगर : मधल्या काळात काही पिचडांची पिलावळ मला बदनाम करीत होती. मी किरकोळ आरोपांकडे दुर्लक्ष केले. पण त्यांच्यात बदलच होत नाहीत. तशी त्यांची लायकीच नाही, असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्यावर केला.

याबाबत आमदार डाॅ. लहामटे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याबाबत `सरकारनामा`शी बोलताना त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली.

आमदार लहामटे म्हणाले, जनता माझ्यावर प्रेम करते. पिचड यांच्या पिलावळीच्या आरोपाबाबत जनतेनेच मला सांगितले, की या पिलावळीचे तुम्ही ऐकून का घेताय. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून मी त्याकडे दुर्लक्ष केले. राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांचे आरोप वाढले. खरं तर त्यांची आरोप करायचीही लायकी नाही. जनतेने मतांतून ते दाखवून दिले आहे. त्यामुळेच या आरोपांना मी उत्तर देत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गटार अमावस्येच्या आदल्या दिवशीची ती भेट 

गटार आमावस्येच्या आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी माझी भेट झाली होती. त्यानंतर आज माझ्यामध्ये राजकीय स्थित्यंतर झाले, एक वर्षात झालेला बदल मोठा आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर जे प्रेम केले, त्यामुळे या तालुक्याचे परिवर्तन झाले. त्यांच्याशी माझी पहिली भेट गटार आमावस्येच्या आदल्या दिवशी झाली, ती भेट खऱ्या अर्थाने माझ्यासाठी परिवर्तन करणारी ठरली. तालुक्याचे भले करणारी ठरली, असे डाॅ. लहामटे यांनी सांगितले.

जे राष्ट्रवादीत होते, ते गटार अमावस्येला भाजपमध्ये गेले, त्यामुळे मला राष्ट्रवादिचे दार उघडे झाले. त्यामुळे ही गटार अमावस्येचा दिवस माझ्यासाठी आठवणीत राहिला आहे. या परिवर्तनामुळे तालुक्याचेही परिवर्तन होत आहे. त्यामुळे गटार अमावस्या माझ्यासाठी खास आहे, असे मत डाॅ. लहामटे यांनी व्यक्त केले.

ती गाडी कार्यकर्त्यांनी दिली

24 फेब्रुवारी 2020 माझा वाढदिवस होता. माझ्या हितचिंतकांनी माझ्यासाठी गाडी बुक केली. त्याची डिपाॅझिटल रक्कम माझ्या कार्यकर्त्यांनी भरली. परंतु ती गाडी अधिवेशनाच्या नंतर आणणार, त्याच दरम्यानच्या काळात 14 मार्चला अधिवेशन संपले. गावाकडे आलो. कोरोनाची स्थिती होती. जनतेच्या हाल अपेष्टा सुरू होत्या. त्या काळात ही गाडी वापरणे मला संयुक्तीक वाटले नाही. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव गुरुपाैर्णिमेच्या दिवशी ती गाडी मला कार्यकर्त्यांनी आणून दिली. परंतु विरोधकांनी त्यावर टीका केली. काय तर म्हणे इनोव्हा क्रिष्टामधून फिरणार. त्यांच्या घरात महागड्या गाड्या आहेत. त्यांची संपत्ती दोन नंबरमधून झाली आहे. असे असताना मला माझ्या कार्यकर्त्यांनी सरळ मार्गाने दिलेली गाडी त्यांना का खुपतेय. गाडीचे हप्ते माझ्या पगारातून कट होणार आहेत. जनता माझ्यावर प्रेम करते, हे विरोधकांना खपत नाही, असा आरोप आमदार लहामटे यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख