अचानक मृत्यू वाढले कसे? नगरमध्ये दिवसभरात 24 जण कोरोनाचे बळी - How did sudden death increase? 24 Corona victims in the city during the day | Politics Marathi News - Sarkarnama

अचानक मृत्यू वाढले कसे? नगरमध्ये दिवसभरात 24 जण कोरोनाचे बळी

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

गुरुवारचा दिवस कोरोना घातवार ठरला आहे. काल दिवसभरात तब्बल 24 कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली.

नगर : गुरुवारचा दिवस कोरोना घातवार ठरला आहे. काल दिवसभरात तब्बल 24 कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. गेल्या अनेक दिवस मृत्यूचा आकडा कमी दिसून येत होता, मात्र काल अचानक वाढलेल्या मृत्यूमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. आतापर्यंत 330 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात काल ७७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ९६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५४ टक्के इतके झाले आहे. काल रूग्ण संख्येत ६३२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ४५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६६, अँटीजेन चाचणीत ३१५ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५१ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३५, नगर ग्रामीण २, राहुरी ५, शेवगाव १, कोपरगाव ८, जामखेड १४, मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल ३१५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ६०,  राहाता ४० , पाथर्डी ५०, नगर ग्रामीण १८, श्रीरामपूर १३, कॅंटोन्मेंट ०३, नेवासे ४२, श्रीगोंदा ६, पारनेर ७, अकोले १८, राहुरी १३, शेवगाव ९, कोपरगाव १०, जामखेड १५ आणि कर्जत ११ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २५१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 19 हजार 961 झाली आहे. सध्या 3 हजार 45 रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण मृत्यूचा आकडा 330 झाला आहे. सध्या जिल्ह्यात 23 हजार 336 रुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोनाबेडच्या उपलब्धतेसाठी नवीन वेबसाईट

जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या आदींची माहिती नागरिकांसाठी covidbed.ilovenagar.com या पोर्टलवर उपलब्ध आहे. तेथे नागरिकांना सर्वसाधारण वार्ड, आयसीयु कक्षातील उपलब्ध बेड आणि ऑक्सिजन कक्षातील उपलब्ध बेडस यांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांना कुठल्या हॉस्पीटलमध्ये बेडस उपलब्ध आहे, हे सहज कळू शकते. त्यामुळे  रुग्णाला वेळेत उपचारासाठी दाखल करणे शक्य होणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख