शनिचाैथऱ्यापर्य़ंत बंदी असूनही भाविकांच्या हातात पुजेचे ताट आले कसे - How the devotees got the puja dish in their hands despite the ban till Saturn | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

शनिचाैथऱ्यापर्य़ंत बंदी असूनही भाविकांच्या हातात पुजेचे ताट आले कसे

विनायक दरंदले
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

पाडव्याच्या दिवशी पहाटे साडेचार वाजता 'सुर्यपुत्र शनिदेव की जय'च्या जयघोषात महंत त्रिंबक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा झाला.

सोनई : राज्य शासनाच्या परवानगी नंतर काल पाडव्याच्या दिवशी पहाटे साडेचारच्या आरती सोहळ्यानंतर स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन खुले करण्यात आले. दिवसभरात साडेतीन हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. आज दिवसभरही भाविकांनी गर्दी केली. दरम्यान, चौथऱ्यापर्य़ंत पूजा साहित्याला बंदी असतानाही भाविकांच्या हातात पुजेचे ताट दिसत होते.

पाडव्याच्या दिवशी पहाटे साडेचार वाजता 'सुर्यपुत्र शनिदेव की जय'च्या जयघोषात महंत त्रिंबक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. मुख्य पुजारी अशोक कुलकर्णी यांनी पौरहित्य केले. या वेळी मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते. आरती सोहळ्यानंतर महाद्वार समोरील संरक्षण कठडे काढून भाविकांना प्रवेश देण्यात आला.

मंदिर बंद झाल्यापासून येथील व्यावसाय बंदच असल्याने काल पहिल्या दिवशी दहा टक्केच दुकाने उघडले. मंदिर प्रशासनाने महाद्वारात हात-पाय धुण्याची व्यवस्था केली. चौथ-यापर्यंत पुजा साहित्याला बंदी असतानाही भाविकांच्या हातात पुजेचे ताट दिसत होते. सायंकाळी झालेल्या आरतीला सुरक्षित अंतर ठेवून शंभर भाविक उपस्थित होते. सर्वांनी चौथऱ्या खालुनच दर्शन घेतले.

इ-पासचीही सुविधा

शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने इ-पासची व्यवस्था करण्यात आली असून, बाहेरचे भाविक शनिदेव डाॅट काॅम या वेबसाईटवर पास काढू शकतात. गावात वाहनतळातील भक्तनिवास नोंदणी कार्यालयात पासची व्यवस्था करण्यात आली आहे, असे शनैश्वर देवस्थानचे तांत्रिक अधिकारी नितीन शेटे यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून हवी नियमावली

दरम्यान, जिल्हाभरातील मंदिरे काल खुले करण्यात आले. भाविकांची मांदियाळी सुरू झाली असली, तरी देवस्थान प्रशासनाला शासनाच्या विशेष मार्गदर्शक सूचना अद्याप जाहीर झाल्या नसल्याने केवळ कोविडच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे, सॅनिकायझरचा वापर, सामाजिक अंतर पाळणे या नियमांचे पालन करण्यात येत आहे. देवस्थान परिसर व गाभारा सॅनिटायझर करून घेणे किंवा हात लागेल तेथे सॅनिटायझरचा वापर करणे, देवस्थान परिसरात मास्क काढणाऱ्यांवर कारवाई आदींबाबतीत प्रशासनाकडून अद्याप नियमावली आली नसल्याने नेमका काय दक्षता घ्यायची, याबाबत लहान देवस्थाने मात्र अनभिज्ञ आहेत. 

शनैश्वर देवस्थानाबरोबरच देवगड, मोहटा देवी, मढी आदी मोठी देवस्थाने आहेत. तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जात असली, तरीही शासनाकडून नियमावली आल्यानंतर त्याची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने होईल, असे देवस्थानच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ट्रस्टचे प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक सजग असून, नियमांची काटेकोर अंमलबजावणी करतील, असा विश्वास प्रशासनाकडून करण्यात आला.

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख