होम क्वारंटाईन संपले अन मंत्री गडाख बैठकांमध्ये रमले - Home quarantine ended and ministers played in Gadakh meetings | Politics Marathi News - Sarkarnama

होम क्वारंटाईन संपले अन मंत्री गडाख बैठकांमध्ये रमले

सुनिल गर्जे
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

मंत्री गडाख यांचा होम कवारंटाईनचा कालावधी संपल्यावर त्यांनी ते पालकमंत्री असलेल्या उस्मानाबाद येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह आढावा बैठक घेऊन कामांचे धडाधड निर्णय घेतले.

नेवासे :  तेरा दिवसांच्या होम होम क्वारंटाइननंतर राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी पुन्हा जनतेत जाऊन कामाचा तसेच कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठीच्या नियोजन बैठकांचा धडाका लावला आहे. त्यांच्या पहिल्या आमदारकीच्या काळातील विकासकामांसह जलसंधारणाच्या कामांमुळे त्यांची जिल्ह्यात आजही `कामदार आमदार, पाणीदार आमदार` ही प्रतिमा कायम आहे.

मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती, महिला बचतगट चळवळीच्या नेत्या सुनीता गडाख यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर मंत्री गडाख हे स्वतःहून होम कवारंटाईन झाले होते. त्यांनीही स्वतःचा स्वॅब तपासणीसाठी दिला होता. तो अहवाल निगेटिव्ह आला होता.

मंत्री गडाख यांचा होम कवारंटाईनचा तेरा दिवसांचा कालावधी संपल्यावर त्यांनी ते पालकमंत्री असलेल्या उस्मानाबाद येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन जनहिताच्या कामांचे धडाधड निर्णय घेतले. ते मार्गी लावण्यासाठी आदेश दिले. उस्मानाबाद येथील दौरा होताच त्यांनी थेट मुंबईत कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. 

नेवासे तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना बाधित रुग्णसंख्या लक्षात घेता मंत्री गडाख यांनी काल नेवासे फाटा येथील कोविड केअर सेंटरला (विलगिकरण कक्ष) भेट देऊन रुग्णांना व विलगिकरण कक्षात असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी याच ठिकाणी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार रुपेश सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, गटविकास अधिकारी शेखर शेलार,  मुख्याधिकारी समीर शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र कानडे, सार्वजनिक बांधकामचे मच्छिंद्र बनसोडे, कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत नेवासे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संदर्भात व कोरोनाच्याबाबत अंमलबजावणी व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला.

या वेळी मंत्री गडाख म्हणाले, "नेवासे तालुक्यात आठ दिवसांपासून ३०-४० गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. नेवासे शहर, सोनई व सलबतपूर येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहे. कोविड सेंटरमध्ये जे बाधित रुग्ण आहे. त्यांना सामाजिक अंतर राखत आज भेटलो. त्यांच्याशी चर्चा करून मानसिकता भक्कम करण्याच्या दृष्टीने हितगूज केले. कोरोनाबाबत कोणीही घाबरून जाऊ नका. धाडसाने पुढे जावे लागणार आहे. आज कोविड सेंटरमध्ये ७९ जणांची तब्येत व्यवस्थित आहे. पुढील दुष्टीने ५०० ते ६०० बेडची व्यवस्था झाली असून, शनिशिंगणापूर व वडाळा हॉस्पिटलमध्ये १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. शिंगणापूर येथे सर्व सुविधा असल्याने व नगर इस्पितळात भरलेले असल्याने शासन व शिंगणापूर यांच्यावतीने उपचार करणार आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख