माजी आमदार राहुल जगतापांच्या पत्राची दखल ! 'त्या' पोलिसांच्या चौकशीचे गृहमंत्र्यांचे आदेश

पंपचालकाच्या तक्रारीसोबतच माजी आमदार जगताप हेही एका पेट्रोलपंपाचे मालक असल्याने त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र गृहमंत्र्यांना दिले होते.
Rahul jagtap.jpg
Rahul jagtap.jpg

श्रीगोंदे : शहरातील कानन पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी दमदाटी करून शिवीगाळ करण्याचा प्रकार सव्वा महिन्यापूर्वी घडला होता. संबंधित पंपचालकाने थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार केली होती. याच घटनेवरुन माजी आमदार राहुल जगताप यांनीही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walsepatil) यांना पत्र देत चौकशीची मागणी केली होती. त्याची दखल घेत वळसे पाटील यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. (Home Minister's direct inquiry into 'those' police inquiries; Note the letter of former MLA Jagtap)

कानन पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक विजय आनंदकर व पंपावरील कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांनी ५ मे २०२१ रोजी दमदाटी केली होती. त्यानंतर पेट्रोल पंपचालकाने गृहमंत्री व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. तसेच सामान्यांना धमकावणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी हा प्रश्‍न चर्चेतून सोडविला जाईल, असे सांगितले होते.

दरम्यान, पंपचालकाच्या तक्रारीसोबतच माजी आमदार जगताप हेही एका पेट्रोलपंपाचे मालक असल्याने त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र गृहमंत्र्यांना दिले होते. या पत्राची दखल घेत गृहमंत्री वळसे पाटील यांनी संबंधित पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.  

हेही वाचा..

पालक गमावलेल्या मुलांना योजनांचा लाभ द्या

नगर : कोरोनामुळे अनेक मुलांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे. काही मुलांनीतर आई-वडील दोघांचाही गमावले आहे. अशा निराधार मुला-मुलींची अगदी गावपातळीपासूनची माहिती संकलित करून जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे सादर करून त्यांना योजनांचा लाभ द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तर कृतिदलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. जी. पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक आर. एल. मोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, बालहक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, समिती सदस्य ॲड. बागेश्री जरंडेकर, प्रवीण मुत्याळ, पोलीस निरीक्षक मसूद खान, चाईल्डलाईनचे प्रतिनिधी महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेली एकूण आठ मुले आहेत. एक पालक गमावलेली १२६ एकूण बालके सापडली आहेत. मात्र, कोरोनाने पालकांचे छत्र हरवलेल्या मुलांना सामाजिक आधार देण्याचे काम राज्य शासनाच्या निर्णयानुसार करण्यात येणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची देखभाल करणारे नातेवाईकांचीही माहिती संकलित करून या मुलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची माहिती घेऊन त्याची नोंद तपासणी अहवालात घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी भोसले यांनी दिल्या.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com