हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवारांचा पूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्क्याने विजयी - In Hivrebazar, Popatrao Pawar's full panel won by a large majority | Politics Marathi News - Sarkarnama

हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवारांचा पूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्क्याने विजयी

मुरलीधर कराळे
सोमवार, 18 जानेवारी 2021

आदर्शगाव हिवरेबाजार येथे 30 वर्षानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्याचे आदर्श गाव प्रकल्प व संकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या पॅनेलचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार नवडून येऊन सत्ता कायम ठेवली.

नगर : आदर्शगाव हिवरेबाजार येथे 30 वर्षानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्याचे आदर्श गाव प्रकल्प व संकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या पॅनेलचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार नवडून येऊन सत्ता कायम ठेवली. तब्बल तीस वर्ष बिनवरोध निवडणूक करून महाराष्ट्राला आदर्श घालवून दिलेल्यात या गावाने आदर्श निवडणूक लढवून नवा आदर्श घालवून दिला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पवार यांनी प्रय़त्न केले, तथापि, गावातील काही व्यक्तिंनी त्याला गालबोट लावले. असे असले, तरीही ही निवडणूक लोकशाही मार्गाने होऊन नवा आदर्श घालवून देऊ, असे पवार यांनी म्हटले होते. तसेच प्रत्येकाला लोकशाहीने दिलेला अधिकार कोणामुळे डावलण्यात येऊ नये, यासाठी पवार निवडणुकीला सामोरे गेले. मतदानाच्या दिवशी रांगेत थांबून ग्रामस्थांनी मतदान केले होते. आज पहिल्याच टप्प्यात मतमोजणी सुरू होऊन पवार यांना भरघोस मते मिळाली, तसेच त्यांच्या पॅनलमधील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

लोकांचा विश्वास हीच जीवनातील उपलब्धी

याबाबत बोलताना पवार म्हणाले, की लोकशाहीमध्ये सर्वांना उभे राहण्याचा अधिकार आहे. यापूर्वी सर्व ग्रामस्थांच्या सभेत उमेदवार जाहीर करून प्रत्येक वेळी बिनविरोध झाले. गेले तीस वर्ष गावात ग्रामपंचायतची निवडणूक झाली नव्हती. परंतु काही व्यक्तांनी निवडणुकीची इच्छा व्यक्त केली. लोकांनीहीही त्यांना हवे असलेले उमेदवार निवडून दिलें. आम्ही शांततेत निवडणूक लढविली. प्रचार पद्धती, मतदान यामध्येही राज्यात वेगळा आदर्श निर्माण करू शकलो. लोकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास हा माझ्या जीवनातील मोठी उपलब्धी आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख