नगर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, काल दिवसभरात १ हजार ३६६ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत हा उच्चांक आहे. दरम्यान, मृतांची संख्याही वाढत असून, ही संख्या 500 च्या उंबरठ्यावर आली आहे. काल रात्रीपर्यंत 495 मृतांची संख्या झाली.
जिल्ह्यात काल तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान काल रूग्ण संख्येत १३६६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ६७७ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २७५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७२० आणि अँटीजेन चाचणीत ३७१ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका ७०, संगमनेर ३६, राहाता ७, पाथर्डी ९, नगर ग्रामीण २१, श्रीरामपूर ०९, कॅंटोन्मेंट १६, नेवासा २६, पारनेर १९, अकोले १४, राहुरी १५, कोपरगाव १९, जामखेड ८, मिलिटरी हॉस्पिटल ३ आणि इतर जिल्हा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ७२० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, महापालिका २७२, संगमनेर १३, राहाता ७३, पाथर्डी १८, नगर ग्रामीण ८४, श्रीरामपुर ५८, कॅंटोन्मेंट ११, नेवासा ३४, श्रीगोंदे १४, पारनेर ३४,अकोले ५, राहुरी ५७, शेवगाव ९, कोपरगांव १५, जामखेड १८ आणि कर्जत ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत काल ३७१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, महापालिका ३५, संगमनेर २६, राहाता ४४, पाथर्डी ३४, नगर ग्रामीण १, कॅंटोन्मेंट १०, नेवासा १७, श्रीगोंदा २४, अकोले ३९, राहुरी ३८, कोपरगाव ४१, जामखेड ३२ आणि कर्जत ३० अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, सध्या जिल्ह्यात 4 हजार 677 रुग्णांवर उपचार सुरू आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 26 हजार 991 झाली असून, एकूण रुग्ण 32 हजार 163 झाले आहेत.

