कुकडीचे आवर्तन सहा जूनला ! या नेत्यांनी केले खास प्रयत्न

कुकडीच्या उन्हाळी आवर्तनासाठी पार पडलेल्या नियोजित बैठकीत येत्या ६ जूनकुकडीचे उन्हाळी आवर्तन सुटणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
rohit-pawar-27fina.jpg
rohit-pawar-27fina.jpg

कर्जत : कुकडीच्या उन्हाळी आवर्तनासाठी पार पडलेल्या नियोजित बैठकीत येत्या ६ जून कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुटणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

उन्हाळी आवर्तनाच्या नियोजनासाठी पुणे येथील सिंचन भवनात काल बैठक झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीसाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक खलील अन्सारी, कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ, कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, कुकडी वितरण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास जगताप, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप आदी उपस्थित होते.

या उन्हाळी आवर्तनासाठी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. त्यानंतर पाणी नियोजनासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बैठक होणार असल्याचे सांगितले होते. आणि त्याच अनुषंगाने ही बैठक पार पडली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येत्या ६ तारखेला आवर्तने सोडण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत दिली आहे.

या आगोदरही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुक्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले होते. कुकडीवर अवलंबून असलेल्या सर्वच तालुक्यांना समान पाणी वाटप व्हावे, असा रोहित पवार यांचा वारंवार आग्रह होता. श्रीगोंदे तालुक्याच्या पाणी नियोजनासाठी माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार यांनी देखील पुढाकार घेतला. सध्या उन्हाळ्याच्या काळात शेती पिकांना पाणी मिळणे गरजेचे असून, आता या पाण्याचा योग्य वापर करणे शेतकऱ्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे.

मागील काळात कुकडीच्या पाण्याबाबत केवळ राजकारण झाले. आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे योग्य नियोजनातून कित्येक वर्षानंतर पाण्याचे नियोजन झाले. घाणीच्या विळख्यात असलेल्या चाऱ्या पोटचाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली. कुकडी अस्तरीकरणाचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागला आहे. पाण्याचे समान वाटप व्हावे, म्हणुन स्वयंचलित मीटर बसवण्यात आले. पाणी नियोजनासाठी शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रे घेण्यात आली. कुकडी स्थापन झाल्यापासून इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यातही कुकडीची दोन आवर्तने सुटत आहेत, ही देखील जमेची बाजू आहे. तालुक्यात आमदार रोहित पवारांच्या नियोजनातून शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे 'टेल-टू-हेड' पाणी मिळणार  आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com