नगरकर हतबल ! पावसाचा जोर अन कोरोनाचा कहर - Heavy rains in the city wreak havoc on Corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

नगरकर हतबल ! पावसाचा जोर अन कोरोनाचा कहर

मुरलीधर कराळे
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

शेतीचे मोठे नुकसान, कोरोनाची धास्ती आणि अतिपावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने नगरकर हतबल होत आहेत.

नगर : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी ढकफुटीच्या घटना घटत आहेत. आधीच कोरोनाने हतबल झालेल्या नगरकरांना पावसाने हैराण केले आहे.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांची पिके अतिपावसाने पिवळी पडली आहेत. अनेक शेतातील पिके वाहून गेली आहेत. शेतीचे मोठे नुकसान, कोरोनाची धास्ती आणि अतिपावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने नगरकर हतबल होत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात आज ७४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार १२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३७ टक्के इतके झाले आहे. काल दिवसभरात रूग्ण संख्येत ९२३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४  हजार ३१३ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १७०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४२३ आणि अँटीजेन चाचणीत ३३० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका ७२, संगमनेर ४, नगर ग्रामीण ८, श्रीरामपूर ५, नेवासे १, श्रीगोंदे ८, पारनेर ३, अकोले १४, राहुरी २, कोपरगाव ८, जामखेड १०, मिलिटरी हॉस्पिटल ३५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४२३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १४९, संगमनेर ३५, राहाता १५, पाथर्डी ९, नगर ग्रामीण ३६, श्रीरामपुर २९,  कॅंटोन्मेंट ६, नेवासे २६, श्रीगोंदा ४, पारनेर २३, अकोले १०, राहुरी ४१, शेवगाव ९, कोपरगाव ७, जामखेड १८ आणि कर्जत ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३३० जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २९, संगमनेर २७, राहाता ५०, पाथर्डी १८, नगर ग्रामीण १८,  श्रीरामपूर १३, कॅंटोन्मेंट ५, नेवासे १२, श्रीगोंदे ११, पारनेर १२, अकोले ३४, राहुरी १२, शेवगाव १९, कोपरगाव १९, जामखेड ३५ आणि कर्जत १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यात बरे झालेल्यांची संख्या 34 हजार 125 झाली असून, उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 4 हजार 313 आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 644 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 39 हजार 82 रुग्णांची नोंद झाली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख