महिनाभरात दिलासादायक दिवस ! कोरोचे रुग्ण आढळले निम्म्यावर कमी - A heartwarming day throughout the month! Koro's patients were found to be less than half | Politics Marathi News - Sarkarnama

महिनाभरात दिलासादायक दिवस ! कोरोचे रुग्ण आढळले निम्म्यावर कमी

मुरलीधर कराळे
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

निम्म्यावर म्हणजे 405 रुग्ण आढळले. त्यामुळे कालचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला. तर मृत्यूचे प्रमाण मात्र विशेष घटले नसून, काल दिवसभरात कोरोनामुळे 16 मृत्यू झाले.

 

नगर : गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढतच होता. रोज किमान 800 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तथापि, काल मात्र निम्म्यावर म्हणजे 405 रुग्ण आढळले. त्यामुळे कालचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला. तर मृत्यूचे प्रमाण मात्र विशेष घटले नसून, काल दिवसभरात कोरोनामुळे 16 मृत्यू झाले.

जिल्ह्यात काल ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०९ टक्के इतके झाले आहे. काल संख्येत ४०५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार १९७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४० आणि अँटीजेन चाचणीत २७२ रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, राहाता १, नगर ग्रामीण ११,  नेवासा २, श्रीगोंदा ३, पारनेर ३, राहुरी १, शेवगाव १४, कोपरगाव ६, जामखेड ९, कर्जत १,  आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १३, संगमनेर ७, राहाता २, नगर ग्रामीण ४, श्रीरामपुर २, श्रीगोंदा १, पारनेर ३, अकोले ३, राहुरी १, कोपरगाव २ आणि कर्जत २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल २७२ जण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर ३६, राहाता ४०, पाथर्डी २६, नगर ग्रामीण २, श्रीरामपूर १, कॅंटोन्मेंट ५, नेवासा १२, श्रीगोंदे १५, पारनेर १७, अकोले १८, राहुरी १३, शेवगाव २०, कोपरगाव २८, जामखेड २४ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

सध्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या 32 हजार 448 असून, आतापर्यंत जिल्ह्यात 614 मृत्यू झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या 37 हजार 259 वर गेली आहे.

ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील अनेकजण

दरम्यान, कोरोनाचे ग्रामीण भागात रुग्ण आढळत असले, तरी एकाच कुटुंबातील जास्त सदस्य आढळत आहेत. एखाद्या व्यक्तीने कोरोनाचे लक्षणे असताना काळजी घेतली नाही, तर त्याच्यामुळे त्याच्या घरच्या लोकांना बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळल्यास त्वरीत कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे पाॅझिटिव्ह आढळल्यास कोविड सेंटरमध्ये उपचार घेणे शक्य होणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख