इंदुरीकर महाराजांच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली ! - Hearing of Indurikar Maharaj's case postponed! | Politics Marathi News - Sarkarnama

इंदुरीकर महाराजांच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली !

आनंद गायकवाड
बुधवार, 2 डिसेंबर 2020

या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे. या खटल्याची आज असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, येत्या 8 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

संगमनेर : अपत्यप्राप्तीबाबत वादग्रस्त विधान केल्याने प्रबोधनकार निवृत्ती देशमुख (इंदोरीकर) महाराज यांच्या खटल्यावर आज सुनावणी होणार होती, तथापि, इंदुरीकर महाराजांचे वकील आजारी असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 

अपत्य जन्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन कीर्तनकार निवृती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्याविरोधात आरोग्य विभागाने पीसीपीएनडीटी (प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा) कायद्याचा भंग केल्याचा खटला दाखल केला आहे. या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे. या खटल्याची आज असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, येत्या 8 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

इंदुरीकर महाराजांचे वकील अॅड. के. डी. धुमाळ यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे आज खटल्याचे कामकाज करु शकत नसल्याचे सांगण्यात आले. या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, मंगळवारी ( ता. 8 ) डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, या खटल्यासंबंधी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात सादर केलेली मुळ कागदपत्रे जिल्हा सत्र न्यायालयात सादर करावीत, असा अर्ज या खटल्यातील अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अरविंद राठोड यांनी दिला असल्याची माहिती देण्यात दिली. या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अॅड. रंजना गवांदे बाजू मांडीत आहेत. सर्वांना लेखी युक्तिवाद सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. 
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख