आरोग्य यंत्रणा कोलमडली, लोकप्रतिनिधी करतात तरी काय : वैभव पिचड - The health system collapsed, what the people's representatives do: Vaibhav Pichad | Politics Marathi News - Sarkarnama

आरोग्य यंत्रणा कोलमडली, लोकप्रतिनिधी करतात तरी काय : वैभव पिचड

शांताराम काळे
रविवार, 13 सप्टेंबर 2020

ऑक्सिजन, औषधे, किट यांचा तुटवडा आहे. या सर्व अवघड परिस्थितीत ताक्याचे लोकप्रतिनिधी नेमका काय करतात, त्यांनी आता बाहेर पडावे, असे आवाहन भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी आमदार डाॅ. किरण लहामटे यांना केले आहे.

अकोले : तालुक्यात आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, ऑक्सिजन, औषधे, किट यांचा तुटवडा आहे. या सर्व अवघड परिस्थितीत ताक्याचे लोकप्रतिनिधी नेमका काय करतात, त्यांनी आता बाहेर पडावे, असे आवाहन भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी आमदार डाॅ. किरण लहामटे यांना केले आहे.

पिचड म्हणाले, की दोन दिवसांपासून रॅपिड टेस्ट किट उपलब्ध नाही. पूर्वी याठिकाणी कार्डियाक रुग्णवाहिका होत्या. त्याही दुसरीकडे हलविल्या आहेत. ज्या 102, 108 धावतीत, त्यामध्ये सुविधा नाहीत. शासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने राबविण्यासाठी योग्य ती पावलं उचलावी लागतात व त्यात लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. याठिकाणी नक्कीच काही तांत्रिक सुविधांचा अभाव राहिला, परंतु आज महामारीच्या काळात स्टाफ कमी झाला व यंत्रणाही ढासळली गेली आहे, असा आरोप पिचड यांनी केला.

अकोले सोमवारपासून बंद

दरम्यान, खानापूर हे उपचार केंद्र नसून केवळ रुग्णांना दाखल करणे, एव्हढेच काम तेथे होत आहे. तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या गतीने वाढत आहे. सरकार व प्रशासन याबाबत कमी पडत आहे, या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अकोले व्यापारी संघटनेने उद्यापासून (ता. 14) आठ दिवस जनता कर्फ्यु लागू करून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर राजूर येथेही रुग्ण वाढू लागल्यामुळे तेथेही ता. 16 पासून 23 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख