आरोग्यदुतांकडून घरोघरी तपासणी सुरू ! नगरमध्ये 744 कोरोना रुग्णांची भर - Health envoys start door-to-door checks! Addition of 744 corona patients in the town | Politics Marathi News - Sarkarnama

आरोग्यदुतांकडून घरोघरी तपासणी सुरू ! नगरमध्ये 744 कोरोना रुग्णांची भर

मुरलीधर कराळे
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात आजपासून माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम सुरू झाली असून, आता प्रत्येक घरात आरोग्यदूत येऊन आजारी व्यक्तीला मार्गदर्शन करणार आहेत.

नगर : जिल्ह्यात आजपासून माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम सुरू झाली असून, आता प्रत्येक घरात आरोग्यदूत येऊन आजारी व्यक्तीला मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, आज जिल्ह्यात नव्याने 744 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २३९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८ आणि अँटीजेन चाचणीत ४६७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७६, संगमनेर १८, पाथर्डी ५, नगर ग्रामीण १२, श्रीरामपूर ९, नेवासे ३९, राहुरी १, शेवगाव ४९, कोपरगाव ८, जामखेड ३, कर्जत १,मिलिटरी हॉस्पिटल १८ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ७, संगमनेर ३, राहाता १४, नगर ग्रामीण १, श्रीरामपुर २,  कॅंटोन्मेंट २, श्रीगोंदे १, पारनेर ५, अकोले १, राहुरी १, जामखेड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल ४६७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ५०, संगमनेर ४७ राहाता ३८, पाथर्डी ३२, नगर ग्रामीण १४, श्रीरामपूर ३५,  कॅंटोन्मेंट ०६, नेवासे १४, श्रीगोंदा १६, पारनेर ३९, अकोले २६, राहुरी १५, शेवगाव ४१, कोपरगाव २५, जामखेड ४३ आणि कर्जत २६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ६८१ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या २७ हजार ६७२ झाली आहे. तसेच उपचार सुरू असलेले रूग्णांची संख्या ४ हजार ७२२ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 593 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण 32 हजार 907 रुग्णांची नोंद झाली आहे.

माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम सुरू

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या  'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेस काल जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या टाकळी खातगाव येथे या मोहिमेचा प्रारंभ झाला. याशिवाय, प्रत्येक तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरुवात करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या पथकामार्फत या घरोघरी सर्वेक्षण मोहिमेस सुरुवात झाली.

कोरोनाला हरवण्यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. आपापल्या भागातील जे नागरिक आजारी असतील किंवा त्यांना कोणती लक्षणे जाणवत असतील, तर त्यांनी तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन उपचार घेतले पाहिजेत. कोणत्याही प्रकारे आजार अंगावर काढू नका. या संसर्गाची साखळी आपण सर्वांनी मिळून तोडली पाहिजे. त्यादृष्टीनेच प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. या भूमिकेतून ही मोहिम सुरु करण्यात आली आहे, असे प्रतिपादन यावेळी विविध वक्त्यांनी केले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख