बरे होण्याची टक्केवारी वाढली ! नगरमध्ये नव्याने आढळले 674 कोरोना रुग्ण - Healing percentage increased! 674 newly found corona patients in the town | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

बरे होण्याची टक्केवारी वाढली ! नगरमध्ये नव्याने आढळले 674 कोरोना रुग्ण

मुरलीधर कराळे
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

कोरोनामुळे आतापर्यंत 718 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण 44 हजार 23 रुग्णांची नोंद झाली आहे.

नगर : जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली असून, हा दर 88.22 टक्के आहे. आतापर्यंत ३८ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज नव्याने 674 रुग्ण वाढले आहे.  

जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ४६७ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२८ आणि अँटीजेन चाचणीत ३७७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, अकोले १२, कर्जत २, नगर ग्रामीण २, नेवासे ५, पारनेर ६, पाथर्डी १, राहुरी १, संगमनेर १, शेवगाव २, श्रीगोंदा १, श्रीरामपूर २, मिलिटरी हॉस्पिटल ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५७, अकोले ८, जामखेड ५, कर्जत ५, कोपरगाव ७, नगर ग्रामीण २६, नेवासा १३, पारनेर १३, पाथर्डी ५, राहाता १२, राहुरी २०, संगमनेर २७, शेवगाव ३, श्रीगोंदा ५, श्रीरामपूर २२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३७७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ३२, अकोले १८, जामखेड ३०, कोपरगाव २३, नगर ग्रामीण ५२, नेवासा ४०, पारनेर ११, पाथर्डी १९, राहाता ३६, राहुरी १६, संगमनेर ३९, शेवगाव २१, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत 718 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण 44 हजार 23 रुग्णांची नोंद झाली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख