केंद्रीय कृषीमंत्र्यांना हजारे यांचे पत्र, `ते` आश्वासन पाळा अन्यथा आंदोलन - Hazare's letter to Union Agriculture Minister, follow that promise otherwise agitation | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रीय कृषीमंत्र्यांना हजारे यांचे पत्र, `ते` आश्वासन पाळा अन्यथा आंदोलन

मार्तंड बुचुडे
सोमवार, 14 डिसेंबर 2020

पाच फेब्रुवारी 2019 रोजी राळेगणसिद्धी येथे येऊन हे लेखी अश्वासन दिले होते. ते अद्याप पूर्ण न झाल्याने हजारे यांनी त्या लेखी पत्राची प्रत माहितीसाठी आज तोमर यांना पाठविली आहे.

पारनेर : तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांना दिलेल्या लेखी आश्वासनाची आठवण हजारे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर एका पत्राद्वारे करून दिली आहे. या आश्वासनाची पूर्तता झाली नाही, तर देशव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.

पाच फेब्रुवारी 2019 रोजी राळेगणसिद्धी येथे येऊन हे लेखी अश्वासन दिले होते. ते अद्याप पूर्ण न झाल्याने हजारे यांनी त्या लेखी पत्राची प्रत माहितीसाठी आज तोमर यांना पाठविली आहे. या बाबत केंद्र सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास मी लवकरच शेतकरी हितासाठी व त्यांच्या या प्रश्नांसाठी देशव्यापी आंदोलन छेडील, असा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या पिकाची खर्चावर अधारीत अधारभूत किंमत ठरविणे, शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी धोरण राबविणे, या आणि इतर मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती ठरविण्यात येईल व ही समिती पाच फेब्रुवारी 2019 अखेर आपला अहवाल सादर करेल, असे लेखी अश्वासन हजारे यांना राळेगणसिद्धी येथे तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री सिंग व मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होेते. या वेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आदी उपस्थित होते. त्यामुळेच आपले आंदोलन थांबविण्यात आल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.

केंद्रीय कृषी मुल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वयत्तता देणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट शेतीमालाची आधारभूत किंमत ठरविणे, फळे, भाजीपला, दुध यासाठी अधारभूत किंमती जाहीर करणे, पाणी वाचविण्यासाठी ठिबक, तुषार व इतरही पाणी बचतीच्या सिंचनसाठी शेतकऱ्यांना 80 टक्के सबसिडी देणे, याशिवाय शेतकरी कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी योजना आखणे या आणि इतर काही बाबीवर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री सोमपाल शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येईल व ती याबाबतचा अहवाल 30 ऑक्टोंबर 2019 च्या पूर्वी सादर करेल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र केंद्र सरकारने याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे मी या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन करण्याचा विचार करत आहे, असे पत्र केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांना पाठवून हजारे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे 5 फेब्रुवारी 2019 ला स्थगित केलेले आंदोलन पुन्हा एकदा सुरू करावे लागेल. त्यासाठी आंदोलनाची तारीख वेळ व ठिकाण लवकरच निश्चिती केले जाईल, असेही हजारे यांनी म्हटले आहे.

 

Edited by - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख