हजारे यांचे दिल्लीत नव्हे, आता उपोषण 30 तारखेपासून राळेगणसिद्धीत - Hazare's fast not in Delhi, now in Ralegan Siddhi from 30th | Politics Marathi News - Sarkarnama

हजारे यांचे दिल्लीत नव्हे, आता उपोषण 30 तारखेपासून राळेगणसिद्धीत

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 जानेवारी 2021

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी हजारे यांनी केंद्र सरकारला उपोषणाचा इशारा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी राळेगणसिद्धीच्या वाऱ्या सुरू केल्या होत्या. मात्र, चर्चा नको; ठोस कार्यवाही करा, असे सांगत हजारे उपोषणावर ठाम होते.

राळेगणसिद्धी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण करण्यासाठी चार वेळा पत्रव्यवहार करूनही दिल्ली प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून (ता. 30) राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरातच उपोषण सुरू करणार आहेत. हजारे यांचे स्वीय सहायक संजय पठाडे यांनी ही माहिती दिली. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी हजारे यांनी केंद्र सरकारला उपोषणाचा इशारा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी राळेगणसिद्धीच्या वाऱ्या सुरू केल्या होत्या. मात्र, चर्चा नको; ठोस कार्यवाही करा, असे सांगत हजारे उपोषणावर ठाम होते.

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीच्या सीमांवर पावणेदोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. आता हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्याने केंद्र सरकारच्या अडचणींत वाढ झाली आहे. 

 

हेही वाचा...

निवडणुकीतील वादातून कुरुंदला एकास मारहाण 

पारनेर : कुरुंद येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उमेदवारी केल्याच्या रागातून काही जणांनी एकास मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिलेवर गावठी पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

अनिल कर्डिले, अमोल कर्डिले, सागर कर्डिले, विवेक कर्डिले, अविनाश कर्डिले, राजू शेळके, राजेंद्र कर्डिले, पंकज कर्डिले, सुहास थोरात, आकाश कर्डिले व रमेश नरवडे (सर्व रा. कुरुंद), अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत जयवंत नरवडे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, कुरुंद येथे नरवडे शेतात काम करीत असताना वरील आरोपी तेथे आले. पिस्तुलाचा धाक दाखवत लाकडी काठ्या, तलवार घेऊन नरवडे यांना मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या नरवडे यांच्या सुनेच्या डोक्‍याला पिस्तूल लावून धाक दाखविला, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

गंभीर जखमी झालेल्या नरवडे यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख