हजारे - विखे पाटील भेट ! त्या श्रेय वादावर टाकला पडदा - Hazare - Vikhe Patil's gift! The curtain fell on that credit dispute | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

हजारे - विखे पाटील भेट ! त्या श्रेय वादावर टाकला पडदा

एकनाथ भालेकर
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

राळेगण थेरपाळ ते बेल्हे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी अण्णा हजारे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांच्याशी दोनदा दूरध्वनीवरून चर्चा केली.

राळेगण सिद्धी : राळेगण थेरपाळ ते बेल्हे या राष्ट्रीय महामार्गाचे भुमीपूजनापूर्वी आज खासदार डॉ. सुजय विखे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धीत भेट घेऊन चर्चा केली. या मार्गाच्या मंजुरीच्या श्रेयवादावरून आरोपांच्या फैरी झडल्या होत्या. हजारे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क करून या कामाचा पाठपुरावा केला होता. डॉ. विखे यांनी हजारे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार मानत श्रेयवादावर पडदा टाकला.

माथा ते पायथा पाणलोट क्षेत्र विकास, बंधारे, पुर्नभरण अशा कामांनी जलसंधारणाचा प्रयोग राळेगणसिद्धीत यशस्वी झाला. एका लोकसभा मतदार संघात असा प्रायोगिक उपक्रम राबवला पाहिजे. केंद्र सरकारनेही जलसंधारणाचे काम देशभर करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा हजारे यांनी विखे पाटील यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केली.

हजारे म्हणाले, की राळेगण थेरपाळ ते बेल्हे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी आपण केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांच्याशी दोनदा दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांच्या सचिवांनी देखील राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्यानंतरच या कामाला मंजुरी मिळाली.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात हस्तांतरण करण्यास वेळ लागणार असल्याने अण्णांच्या सूचनेनुसार केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. खासदार विखे यांनी राळेगण सिद्धीतील पाणलोट क्षेत्राची कामे पाहण्यासाठी यावे, असे निमंत्रण हजारे यांनी त्यांना दिले.

या वेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे, भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, सुभाष दुधाडे, सभापती गणेश शेळके, राहूल शिंदे, विश्वनाथ कोरडे, भाजपचे नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, उद्योजक सुरेश पठारे, दादा पठारे, माजी उपसरपंच लाभेश औटी, सुनिल हजारे, शाम पठाडे, आदी उपस्थित होते.

(कै.) बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न अधुरे

महाराष्ट्रातील पश्चिम वाहिन्या नद्या समुद्राला मिळतात, या नद्यांचे पाणी नगर जिल्ह्यातील शेतीसाठी उपयोगात आणण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी  माजी केंद्रिय मंत्री (कै.) बाळासाहेब विखे यांचे प्रयत्न होते. अतिशय चांगला प्रकल्प होता. परंतु निधनामुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिल्याचे हजारे म्हणाले.
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख