शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी हजारे यांनी सांगितले हे उपाय - Hazare said the measures were taken to stop farmers' suicides | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी हजारे यांनी सांगितले हे उपाय

मार्तंड बुचुडे
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर त्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शफारशींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. या आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव देणे गरजेचे आहे.

पारनेर : भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवावयाच्या असतील, तर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे, कृषीमूल्य आयोगास स्वयत्तता देणे व भाजीपाला फळे, दुधास ऊत्पादन खर्चावर आधारीत बाजारभाव देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

शेतीप्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले, की भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. तरी सुद्धा देशातील शेतकरी आत्महत्या करतात, हे देशाचे दुर्देव आहे. दिल्लीत देशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यास मी पाठिंबा दिला आहे. त्यासाठी राळेगणसिद्धी येथे एकदिवस लाक्षाणिक उपोषणही केले होते. मात्र केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन कृषी कायद्यातील केवळ तीन कायदे रद्द केल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असेही हजारे म्हणाले.

ते म्हणाले, की देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर त्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शफारशींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. या आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा पिकाचा पेरणी पूर्व ते थेट पीक काढणी पर्यंतचा खर्च विचारात घेऊन त्यात 50 टक्के वाढ देऊन हमी भाव ठरविणे गरजेचे आहे. 
तसेच राज्याच्या कृषी मूल्य आयोगास निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता देणे गरजचे आहे.

या आयोगात राज्यातील विविध कृषी विद्यापीठाचे कुलगुरू असतात, ते विविध पिकांची पहाणी करूण एकूण खर्च विचारात घेऊन केंद्र सरकारला शेतकऱ्यांना किती बाजारभाव देणे गजचे आहे, याची शिफारस करतात. मात्र केंद्र सरकार त्या शिफरशीनुसार बाजारभाव न देता त्यात 10 ते 20 टक्के नव्हे, तर थेट 50 टक्के कपात करूऩ बाजारभाव ठरवितात, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यासाठी या कृषीमूल्य आयोगास स्वायत्त देणे गरजेचे आहे, म्हणजे त्यांनी ठरविलेला हमी भाव केंद्र सरकाला कमी करता येणार नाही व शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या नाशवंत वस्तू भाजीपाला फळे व दुध यासाठी सुद्धा उत्पादन खर्च विचारात घेऊन बाजारभाव ठरविणे काळाची गरज आहे. हे व्यावसाय शेतीपूरक व्यावसाय आहेत, यावर शेतकऱ्यांचा दैनंदिन खर्च चालत असतो, असे हजारे यांनी सांगितले. 

भाजापीला, दुध व फळे ही नाशवंत आहेत, त्यासाठी सरकारने तालुका स्तरावर किंवा मोठ्या गावात शितगृह बांधणे गरजेचे आहे. तेथे हा नाशवंत माल ठेवता आला पाहिजे. तसेच शेतीसाठी ठिबक व तुषार सिंचन योजना फक्त कागदावर न राबविता शेतकऱ्यांच्या शेतात राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी 80 टक्के अनुदान देणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होईलच, शिवाय शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने शेती ऊत्पदनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. या माझ्या गेली अनेक वर्षापासून मागण्या आहेत. त्यासाठी मी दिल्ली व राळेगणसिद्धी येथे देशभरातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन दोन आंदोलनेही केली आहेत. केंद्र सरकारने मला लेखी अश्वासनही दिले आहे, मात्र त्याबाबत सरकार कार्यवाही करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, असेही हजारे यांनी सांगितले.

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख