अंगावर गुलाल दिसेल त्याला पोलिसांनी चोपले! गणेगावात मिरवणुकीत लाठीचार्ज - Gulal can be seen on his body, he was beaten by the police! Lathichar in the procession in Ganegaon | Politics Marathi News - Sarkarnama

अंगावर गुलाल दिसेल त्याला पोलिसांनी चोपले! गणेगावात मिरवणुकीत लाठीचार्ज

विलास कुलकर्णी
सोमवार, 18 जानेवारी 2021

काठ्यांचा प्रहार होताच कार्यकर्त्यांना पळता भुई थोडी झाली. पथकाने घराघरांत घुसून, अंगावर गुलाल दिसेल त्याला बदडले.

राहुरी : ग्रामपंचायत निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जेसीबीवरून गुलाल उधळत, डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढणाऱ्यांना पोलिसांनी अडविले; पण कोणीच ऐकत नव्हते. अखेर दंगलनियंत्रण पथकाने थेट जमावावर हल्लाबोल केला. काठ्यांचा प्रहार होताच कार्यकर्त्यांना पळता भुई थोडी झाली. पथकाने घराघरांत घुसून, अंगावर गुलाल दिसेल त्याला बदडले. याप्रकरणी 20 जणांना अटक झाली. 50 जणांवर गुन्हे दाखल झाले. 

गणेगाव येथे भाजपने राष्ट्रवादीचा पराभव करीत सर्व नऊ जागांवर दणदणीत विजय मिळविला. हा विजय साजरा करण्यासाठी सायंकाळी उमेदवारांची जेसीबीवरून मिरवणूक निघाली. डीजेचा आवाज घुमला. जेसीबीवरून गुलालाची उधळण सुरू झाली. याबाबत पोलिसांना माहिती समजताच, तीन पोलिसांनी मिरवणूक बंद करण्याची विनंती केली; परंतु त्यांचे कोणीही मनावर घेतले नाही. 

याबाबत पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना कळविले. त्यांनी ही बाब पोलिस अधीक्षकांच्या कानावर घातली. सूत्रे हलली. दंगलनियंत्रक पथकाचे एक उपनिरीक्षक व 27 जणांचे पथक चार वाहनांतून गावात दाखल झाले. त्याने थेट मिरवणुकीवर हल्लाबोल केला. भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भानगडे यांच्यासह 20 जणांना राहुरी पोलिस ठाण्यात आणले. 50 जणांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले. 

 

 

हेही वाचा...

राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे विजयी उमेदवार ः

कात्रड : ऋषिकेश घुगरकर, उषा निकम, लता पठारे, आसाराम ससाणे, बाबासाहेब शिंदे, शैला सत्रे, बाबासाहेब तांबे, आश्‍लेषा ठाणगे, शारदा दांगट, संदीप निकम, सुनीता पागिरे, शरद दांगट, रंगूबाई ठाणगे. 

पिंपळगाव फुणगी : शिवाजी जाधव, सुनीता वडितके, रोहिणी नान्नोरे, तुषार फुणगे, हरिभाऊ तोरे, सुनीता जाधव, रामभाऊ वडितके, नंदा जाधव, सुनीता वर्पे. 

वळण : एकनाथ खुळे, विमल रंधे, शोभा आढाव, संजय शेळके, अशोक कुलट, ललिता आढाव, सुरेश मकासरे आशाबाई खुळे, सुभाष ठाकर, पूजा फुणगे, लीलाबाई गोसावी. 

कुरणवाडी : शक्तिमान गायकवाड, भीमाबाई खिलारी, संगीता डव्हाण, सुनील खिलारी, वैशाली खिलारी, अण्णासाहेब खिलारी, सविता खिलारी. 

मल्हारवाडी : मच्छिंद्र गावडे, मंदाकिनी गावडे, रूपाली जाधव, भीमाबाई गागरे, अर्चना सागर, सुशीला गाडे, मंगेश गाडे. 

केसापूर : सचिन टाकसाळ, ज्योती गायकवाड, सुशीला मेहेत्रे, बाबासाहेब पवार, आरती भगत, मीनाक्षी मेहेत्रे, अनिल बोधक, गुलाब डोखे, कांचन रणदिवे. 

दवणगाव : गोकुळदास साळुंके, शिवाजी खपके, पार्वतीबाई जऱ्हाड, राजेंद्र खपके, अर्चना होन, सुमन मोहटे, प्रदीप भोसले, शीतल खपके, सुवर्णा होन. 

संक्रापूर : संजय जाधव, हिराबाई जगताप, शकिला शेख, सुरेश पवार, मीराबाई पांढरे, रामदास पांढरे, वैशाली चव्हाण. 

रामपूर : राजेंद्र खळदकर, जयश्री मोरे, शोभा शिंदे, राहुल भोसले, राहुल साबळे, मीना मोरे, प्रमोद नालकर, मयूरी पठारे, रेणुका साबळे. 

चेडगाव : भाऊसाहेब शिंदे, अनिता तरवडे, चंद्रकला तरवडे, नंदा दीपक ताके, लता जाधव, मुक्ताबाई जाधव, संजय खरात, कैलास तरवडे, वृषाली तरवडे. 

तांदुळनेर : राहुल निमसे, नबाबाई बेलकर, गंगूबाई मुसमाडे, भगवंत साबळे, स्वाती साबळे, बाळासाहेब शिंगोटे, साधनाबाई शिंगोटे. 

पाथरे खुर्द : अजितकुमार धुळे, श्रीधर जाधव, नीता घारकर, सचिन काळे, गंगूबाई जाधव, मनीषा जाधव, शरद पठारे, मनीषा गावडे, हिराबाई टेकाळे. 

आंबी : रावसाहेब फुलमाळी, गणेश कोळसे, मंगल जाधव, संदीप साळुंके, यमुनाबाई कोळसे, स्मिता लोंढे, विजय डुकरे, संगीता साळुंके, उज्ज्वला डुकरे. 

अंमळनेर : नंदकुमार जाधव, उज्ज्वला साळुंके, पुष्पा साळुंके, किरण कोळसे, अरुणा जाधव, रोहन जाधव, प्रीती पाळंदे. 

वांजूळपोई : श्रीरंग पवार, माधव चव्हाण, सुवर्णा पवार, आप्पासाहेब गुरसळ, लक्ष्मीबाई माळी, मुक्ता डोंगरे, वैशाली जाधव, लोचनाबाई पवार, सविता कोळपे. 

गुहा : बबन कोळसे, ऋतुजा कोळसे, प्रीती कोळसे, बबन वर्पे, मनीषा ओहोळ, राम बर्डे, अरुणाबाई ओहोळ, रवींद्र शिंदे, रवींद्र उऱ्हे, उषा चंद्रे, नीलेश ओहोळ, पूनम कोळसे, शकिला सय्यद. 

तांभेरे : सागर मुसमाडे, लक्ष्मीबाई मुसमाडे, सुषमा मुसमाडे, उमेश मुसमाडे, कल्पना हुडे, सरिता शेलार, किशोर तांबे, पूनम शेलार, नितीन गागरे, सुजाता मुसमाडे, मनीषा कांबळे. 

कणगर : भाऊसाहेब आडभाई, बाबासाहेब गाढे, अश्विनी घाडगे, धनंजय बर्डे, मंदाकिनी घाडगे, जुबेदाबी इनामदार, सर्जेराव घाडगे, छाया गाढे, अर्चना घाडगे, बाळासाहेब गाढे, सीमा घाडगे, रामदास दिवे, मनीषा दिवे. 

वावरथ : सविता बाचकर, कोमल जाधव, वसाबाई दुधवडे, रावसाहेब केदार, शारदा जाधव, अरुणाबाई बाचकर, भागा पवार, गणू बाचकर, प्रतिभा बाचकर. 

जांभळी : शकुंतला बाचकर, ताराबाई मधे, सुंदराबाई भुतांबरे, शत्रू पवार, आदिका बाचकर, सुनील मधे, आस्मा शेख. 

वरवंडी : भाऊसाहेब कोळेकर, शकुंतला पवार, जगदीश भालेराव, पप्पू बर्डे, दीपाली बरे, सलीम शेख, प्रियंका त्रिभुवन, मुन्नाबाई परदेशी, ईश्वर अडसुरे, सुवर्णा कदम, आशाबाई ढगे. 

बोधेगाव : रामचंद्र माळवदे, पूजा लावर, योगिता शिंदे, किशोर शिंदे, संध्या पवार, रामदास रजपूत, प्रतिभा शिंदे. 

चांदेगाव : बाळासाहेब बर्डे, मधुकर शिंदे, सुनीता कोतकर, नवनाथ वायदंडे, जया गायकवाड, निर्मला भांड, दत्तात्रेय खर्डे, सुनीता खर्चन, वैशाली माळवदे. 

उंबरे : बापूसाहेब दुशिंग, विजयाबाई ढोकणे, सारिका ढोकणे, सुरेश साबळे, कैलास अडसुरे, सुनीता वाघ, साहेबराव गायकवाड, आदिनाथ पटारे, सुवर्णा पंडित, गणेश ढोकणे, सीमा दारकुंडे, ज्योती ढोकणे, संजय अडसुरे, रतनबाई ढोकणे, नीता ढोकणे. 

चिंचाळे : एकनाथ जाधव, सतीश बाचकर, पारूबाई जाधव, बापूसाहेब गडधे, लता गडधे, इंदूबाई तिखुले, बाबासाहेब वडितके, तान्हूबाई पवार, आदिती सानप. 

राहुरी खुर्द : पोपट चोपडे, राम तोडमल, मंगल शेडगे, गोरक्षनाथ कटारनवरे, नरेंद्र शेटे, लता माळी, असफखान पठाण, सविता धोत्रे, निर्मला मालपाणी, तुकाराम बाचकर, मीना घोकसे, मनीषा शेंडे, मालती साखरे, प्राजक्ता शेटे, शिवाजी पवार. 

धानोरे : सचिन दिघे, श्वेता दिघे, योगिता दिघे, दिगंबर दिघे, मनीषा ब्राह्मणे, पूजा लांडे, शामू माळी, ज्ञानेश्वर दिघे, प्रतिभा दिघे. 

गुंजाळे : आदिनाथ मोटे, मनीषा नवले, सुभद्राबाई ढगे, संभाजी सरोदे, चंद्रकला चेंडवल, आशा नवले, अविनाश हनवत, भारती सरोदे, सीमा नवले. 

कुक्कडवेढे : चांगदेव नागदे, हिराबाई तिडके, अर्चना पानसरे, उत्तम बर्डे, अक्षय गटकळ, पद्मावती सोनवणे, दीपक मकासरे, उज्ज्वला चौधरी, छाया येवले. 

पिंप्री अवघड : प्रियंका बर्डे, शिवाजी लांबे, आसराबाई लांबे, अमोल गायकवाड, मीनाक्षी लांबे, परवीनबानो शेख, लहानू ऊर्फ बापू तमनर, ऊर्मिला लांबे, रेखा पटारे. 

लाख : अशोक शेळके, लहानबाई गल्हे, आरिफा इनामदार, अशोक जाधव, योगिता आढाव, सुरेखा खाडे, रामेश्वर जाधव, राजेंद्र शेळके, मुक्ताबाई तुपे. 

वडनेर : हौशाबापू बलमे, जिजाबाई बलमे, लताबाई बाचकर, मच्छिंद्र बलमे, दादा हारदे, ललिता खेमनर, शशिकांत दिवे, लताबाई बलमे, अलकाबाई बलमे. 

वरशिंदे : दीपक वाबळे, आसराबाई नेहे, मोहन वाबळे, सोनाली आहेर, अर्चना वाबळे, आप्पासाहेब नेहे, कलाबाई विधाते. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख