गुलाबराव पाटील यांच्याकडून साईबाबांकडे या नवसाची पूर्ती - Gulabrao Patil fulfilled this vow to Sai Baba | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

गुलाबराव पाटील यांच्याकडून साईबाबांकडे या नवसाची पूर्ती

सतीश वैजापूरकर
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

विधानसभा निवडणुकीपूर्वी वनी येथील सप्तशृंगी देवी व साईबाबांना नवस केला होता. त्यांच्या कृपेने निवडणूक जिंकलो.

शिर्डी : विधानसभा निवडणूक जिंकलो, त्यावेळीच साईबाबांच्या समाधिचे दर्शन घेऊन नवसपूर्ती करायची होती. मात्र लाॅकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. आज नवसपूर्ती झाल्याचे समाधान मिळाले. साईसंस्थानच्या प्रशासनाने भाविकांची दर्शन व्यवस्था उत्तम केली आहे. भाविक आनंदी आहेत. शांततेत साईदर्शन घेत आहेत. येथे काही त्रुटी असतील तर पुढील सात दिवसांचा वेळ त्यांना द्यायला हवा, असे मत राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

आज त्यांनी येथे येऊन साई समाधिचे दर्शन घेतले. त्यांच्या समावेत साईसंस्थान नोकरांच्या पतपेढीचे संचालक विठ्ठल पवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय शिंदे, अमोल गायके, रवि सोनावणे, प्रसाद शेळके, प्रतिक शेळके आदि पदाधिकारी होते.

ते म्हणाले, की विधानसभा निवडणुकीपूर्वी वनी येथील सप्तशृंगी देवी व साईबाबांना नवस केला होता. त्यांच्या कृपेने निवडणूक जिंकलो. मात्र कोविडमुळे वर्षभर नवसपूर्ती करता आली नाही. आज ती पूर्ण झाली. राज्यातील मंदिरे बंद करावीत, अशी राज्य सरकारची इच्छा व मानसिकता नव्हती. मात्र कोविडच्या फैलाव रोखण्यासाठी मनाविरूध्द निर्णय घ्यावे लागले. `माझे कुटूंब माझी जबाबदारी` या उक्तीचे पालन केले. मास्क व शारीरिक अंतर ठेवण्याची काळजी घेतली. तर कोविडची दुसरी संभाव्य लाट येणार नाही. साई दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलो त्यावेळी भाविक सर्व नियमांचे पालन करीत असल्याचे दिसले. साईसंस्थानने खरोखरीच उत्तम दर्शनव्यवस्था केली आहे.

दरम्यान, साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी शिर्डी येथे गर्दी केली असून, दोन दिवसांपासून हजारो भाविक शिर्डीत दाखल होत आहेत. शिर्डीतील दर्शनव्यवस्था संस्थानने केली असून, कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. येथील सर्व व्यवस्था पाहून गुलाबराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख