पारनेर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल (ता. 26) आमदार नीलेश लंके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. आमदार लंके यांचे वडील ज्ञानदेव व मातु:श्री शकुंतला यांनी त्यांचे स्वागत केले.
आमदार लंके यांचे साधे घर व साधे राहणीमान पाहून पालकमंत्री भारावून गेले. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. आमदार लंके यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य राणी लंके, दीपक लंके, चंद्रकांत मोढवे, राजेंद्र दळवी, राजेंद्र शिंदे, संदीप शिंदे, धोंडीभाऊ नगरे, सुहास नगरे, नंदू सोंडकर, तुकाराम नवले आदी उपस्थित होते.
हेही वाचा..
वीजप्रश्नी मंत्र्यांवरच गुन्हे दाखल करण्याची मागणी
पारनेर : कोरोना काळात राज्यात विजवितरण कंपणीने मिटरचे वाचन न करता गरीबांना मोठ्या प्रमाणात वाढीव बिले पाठविली व त्याची वसुलीही केली, अशा प्रकारे विजवितरण कंपणीने वाढीव बिले पाठवून जनतेची फसवणूक केली आहे, त्यामुळे उर्जा मंत्री नितिन राऊत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन पारनेर तालुका महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्या नेतृत्वाखाली पारनेर व सुपे पोलिस ठाण्यात देण्यात आले.
कोरोना काळात शहरी तसेच ग्रामिण भागातही मिटरचे वाचन न करता ग्राहकांना विजबिले देण्यात आली होती. त्यामुळे वापरापेक्षा कितीतरी अधिक बिले ग्राहकांना आली त्याचा ग्राहकांना मोठी भूदंड बसला होता. त्या वेळी ग्रामिण व शहरी भागातूनही विजवितरण कंपणीच्या विरोधात वाढीव बिलाबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र ग्राहकांना अता तुम्ही बिले भरा, नंतर ती कमी करूण दिली जातील, असे अश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन पाळले गेले नाही. याचा निषेध करत मनसेच्या वतीने ज्या ग्राहकांना अधिक वाढीव बिले आली, ती कमी करावीत व या पुढील काळात येणा-या बिलातून ती वजा करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्या नेतृत्वाखाली पारनेर व सुपे पोलिस ठाण्यात जनतेची वाढीव लाईटबिल पाठवून फसवणूक केली, त्यामुळे उर्जा मंत्री राऊत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी निवेदनाद्वारे केली. या वेळी जिल्हा उपअध्यक्ष मारुती रोहकले ,सहकार सेनेचे नितिन म्हस्के, तालुका उपअध्यक्ष अविनाश पवार, वशिम राजे, सतीश म्हस्के, महेंद्र घाडगे, नारायण नरवडे, रावडे, अजय दावभट, अक्षय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थीत होते.
Edited By - Murlidhar Karale

