नगर : जिल्ह्यात आज ४१५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ७९७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान आज रूग्ण संख्येत ३७६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हाजर १४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ११६, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०२ आणि अँटीजेन चाचणीत १५८ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ५, कर्जत २, कोपरगाव ४, नगर ग्रामीण १२, नेवासे ४, पारनेर ६, पाथर्डी १४, राहाता १२, राहुरी १७, संगमनेर ३, श्रीगोंदा २, श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १०२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ४७, अकोले १, जामखेड ७, कोपरगाव १, नगर ग्रामीण ३,, नेवासे ५, पाथर्डी २०, राहाता २, संगमनेर ३, श्रीगोंदा ८, मिलिटरी हॉस्पिटल ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १५८ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २०, अकोले १२, जामखेड १४, कर्जत १०, कोपरगाव ३, नगर ग्रामीण ९, नेवासे १, पारनेर ७, पाथर्डी ३६, राहाता १०, संगमनेर १, शेवगाव १६, श्रीगोंदा १९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आजपर्यंत 45 हजार 797 रुग्ण कोरोनातुन मुक्त झाले असून, 4 हजा 14 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 788 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल् असून, एकूण रूग्ण संख्या ५० हजार ५९९ इतकी झाली आहे.

