हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला ! आमदार मोनिका राजळेंनी दिला आधार - The grass that came with the hands and mouth was cut off! Support given by MLA Monica Rajale | Politics Marathi News - Sarkarnama

हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला ! आमदार मोनिका राजळेंनी दिला आधार

राजेंद्र सावंत
रविवार, 21 मार्च 2021

शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीमुळे हिरावला गेला. पिकासाठी झालेल्या लाखो रुपयांचा खर्च वाया गेला. 

पाथर्डी : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तालुक्‍यातील 15-20 गावांतील पिकांचे मोठे नुकसान झाले. आमदार मोनिका राजळे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्‍याम वाडकर, तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी आज नुकसानीची पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीमुळे हिरावला गेला. पिकासाठी झालेल्या लाखो रुपयांचा खर्च वाया गेला. दरम्यान, पाथर्डी व शेवगाव तालुक्‍यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी अधिकाऱ्यांना द्यावेत. तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. 

हेही वाचा... साकळाईचा प्रश्न थेट संसदेत

काळेगाव येथील चंदा मोहन सातपुते यांचे घर वादळात पडल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला. घडलेली परिस्थिती सांगताना सातपुते यांना अश्रू अनावर झाले. सुवर्णयुग तरुण मंडळाने पाच हजार रुपये, तर आमदार मोनिका राजळे यांनी त्यांना 10 हजार रुपयांची मदत केली. 

अवकाही पावसाने लाखो रुपये खर्चून जपलेले पीक वाया गेले. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना कोणताही पक्ष नसतो, असे सुसरे येथील शेतकरी दादासाहेब कंठाळी यांनी सांगितले.

हेही वाचा.. सीताराम गायकर यांनी पिचडांचे काम केलेच नाही

पाथर्डी व शेवगाव तालुक्‍यात हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा, गहू, हरभरा, डाळिंब, चिंच, टरबूज, केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्यास सुरवात केली आहे. सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, यासाठी आग्रह धरणार आहे, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

 

हेही वाचा... 

"नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार' 

राहुरी : गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीची नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अधिकाऱ्यांसह बांधावर जाऊन पाहणी केली. नुकसानीचा प्राथमिक अहवाल तत्काळ बनविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करू, अशी ग्वाही मंत्री तनपुरे यांनी दिली. 

पाथर्डी तालुक्‍याचा नियोजित दौरा रद्द करून, मंत्री तनपुरे यांनी आज तालुक्‍यातील बारागाव नांदूर, मल्हारवाडी, घोरपडवाडी, गाडकवाडी, म्हैसगाव, कोळेवाडी येथील नुकसानीची पाहणी केली. तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे उपस्थित होते. 

दरम्यान, पाथर्डी तालुक्यात मोठे नुकसान झाले असून, महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

 

Edited By - Murlidhar karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख