हिरडा खरेदीवरून पिचड-लहामटे यांच्यात जुंपणार

शासन हिरडा खरेदीकरीत नसल्यानेशेंडी (भंडारदरा), राजूर, कोतुळ इथल्या व्यापाऱ्यांकडून वजनात काटा मारण्याचे प्रकार सातत्याने होत असतात.
vaibhav pichad and kiran lahamte
vaibhav pichad and kiran lahamte

अकोले : तालुक्यातील आदिवासी शेतकरी हिरडा बाजारात आणतात. मात्र व्यापारी काटा मारून मोठे नुकसान करतात. सरकारने हिरडा खरेदी न केल्याचा हा परिणाम आहे. व्यापाऱ्यांकडून आदिवासी शेतकऱ्यांची सर्रास लूट होताना स्थानिक आमदार नेमका काय करतात, असा सवाल भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी केला. त्यांना आमदार डाॅ. किरण लहामटे काय उत्तर देतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हिरडा विक्रीचा गंभीर प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून आहे. स्थानिक आदिवासी अभयारण्यातून उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाच्या सुरुवातीला हिरडा तोडून बाजारात विक्रीस आणतात. शासन हिरडा खरेदी करीत नसल्याने शेंडी (भंडारदरा), राजूर, कोतुळ इथल्या व्यापाऱ्यांकडून वजनात काटा मारण्याचे प्रकार सातत्याने होत असतात. 

निसर्गाचे भरभरून देणे लाभलेला वैभवशाली तालुका म्हणून अकोले तालुक्याकडे पाहिले जाते. तालुक्यात प्रचंड मोठी वनसंपदा आहे. हरिश्चंद्रगड - कळसुबाई संरक्षीत अभयारण्य आणि त्यात असलेले नानाविविविध वनस्पती. प्राणी, पक्षी यांच्या प्रजाती. मुबलक पाणी पाऊस यांनी संपन्न असलेली ही भूमी आणि त्याच भूमीत आपल्या प्राचीन परंपरा जपून गुण्यागोविंदाने आपली उपजीविका करतात. शेती, पशुपालन आणि वनउपज यांवर भागवणार मोठा आदिवासी जनसमुदाय आहे.

व्यापारी मारतात काटा

व्पापाऱ्याच्या काट्यात तब्बल 6 किलोचा गफला झाल्याचे सोमा धिंदळे सांगतात.  ते म्हणाले, 'घरचा हिरडा बाजार आणला, चांगला गोण भरून होता. आधी दुकानात नेऊन मोजला 35 किलो भरला, मग व्यापाऱ्याच्या काट्यावर टाकला, तर 29 किलो भरला, अशी व्यथा मांडली.

व्यापारी जेव्हा गरीब आदिवासी लोकांचा हिरडा काट्यावर ठेवतात, तेव्हा ते चलाखी करतात. हिरडा काट्यावर ठेवायचा आणि किती वजन झाले ते पटकन सांगायचे. समोरच्या व्यक्तीने नीट बघायच्या आत तो हिरडा ढिगात ओतून द्यायचा. म्हणजे पुन्हा समोरच्या हिरडा विकणाऱ्याने काही शंका घेतली, तरी त्याचाच हिरडा तो ढिगातून पुन्हा काढून खर खोटं करू शकत नाही!

सरकारने हिरडा खरेदी करावा

भंडारदरा भागातील वाकी, शेंडी, भंडारदरा, मुरशेत, पांजरे, उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, कोलटेम्भे, मुतखेल तसेच हरिश्चंद्रगड परिसरात येणारे पाचनई, अंबित, कुमशेत इत्यादी गावे अभयारण्यातून मिळणारा हिरडा, आंबट येडींगा, करवंद, आंबा, जांभूळ तोडून ते स्थानिक बाजारात विकून आपली उपजीविका भागवतात. मात्र सरकारने हिरडा खरेदी न केल्याने सर्व हिरडा पावसाने खराब झाला आहे. आदिवासीच्या हातात पैसे नसल्याने त्याला उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी शासनाने आम्हाला जीवदान द्यावे, अशी मागणी आदिवासी भागातील सरपंच, ग्रामस्थ, आदिवासी संघटना यांनी केली आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com