कोरोनाबाबत सरकारने जबाबदारी झटकू नये : हजारे - Government should not shirk responsibility for Corona: Hazare | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

कोरोनाबाबत सरकारने जबाबदारी झटकू नये : हजारे

मार्तंड बुचुडे
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

सरकारने तातडीने योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. जनता बेजबाबदारपणे वागते, याचा अर्थ सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही.

पारनेर : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रूग्णांना आॅक्सिजन बेड मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. सरकारने तातडीने योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. जनता बेजबाबदारपणे वागते, याचा अर्थ सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

मार्च महिण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र लॉकडाऊन उठविल्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या अतिशय मोठ्या प्रमाणात शहरी भागाबरोबरच ग्रामिण भागातही रूग्ण वाढत वाढत आहेत. अशा स्थितीत खरी जनतेची जबाबदारी आहे. आपण स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. अत्यंत गरजेचे काम असेल, तरच घराबाहर पडावे. बाहेर पडताना पूर्णपणे काळजी घ्यावी. आपली व कुटुंबाची काळजी घेणे, ही ज्याची त्याची जबाबदारी आहे, मात्र जनता बेजबादारपणे वागत आहे, विनाकऱण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे ही मंडळी कोरोनाला जणू निमंत्रणच देत आहेत, असेही हजारे म्हणाले.

असे असले तरी सुद्धा याचा अर्थ सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही. सरकारने रूग्ण संख्या वाढत आहे, यासाठी वाढीव रूग्णालये उभारणे गरजेचे आहे. आॅक्सिजन बेड किंवा औषोधोपचार मिळाला नाही, त्यामुळे कोणत्याही स्थितीत कोरोना रूग्णास मृत्यू येऊ नये. यासाठी सरकारी यंत्रणेने काळजी घेणे गरजेचे आहे. वाढत्या  रूग्ण संख्येमुळे सरकारी यंत्रणेवर ताण आला आहे, हे खरे आहे. असे असले, तरी सरकारने अगामी काळात रूग्ण संख्या वाढणार आहे, याचा विचार करूण शहरी भागासह ग्रामिण भागात रूग्णालये उभारणे गरजेचे आहे किंवा खासगी रूग्णालये ताब्यात घेणे आवश्यक आहे. 

कोरोनावर लवकर लस येईल, असे चिन्ह सध्या तरी दिसत नाही. कोरोना रूग्णांना पैसे देऊनही उपचाराअभावी मृत्यू येत असेत, तर तो योग्य नाही. त्यासाठी सरकारी पातळीवर तातडीने कोरोना उपचारासाठी लागणारी औषधे तसेच आॅक्सिजन बेड, कोरोना टेस्टसाठी लागणारी किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध करूण देणे गरजेचे आहे, असेही हजारे यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख