Good news for ATKT students! Minister Tanpure's green signal on the demand of Satyajit Tambe | Sarkarnama

ATKT विद्यार्थ्यांसाठी ब्रेकिंग ! तांबेंच्या मागणीवर मंत्री तनपुरे यांचा ग्रीन सिग्नल

मुरलीधर कराळे
मंगळवार, 2 जून 2020

ATKT विद्यार्थ्यांचे काही विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांचे शेवटच्या वर्षाबरोबरच इतर विषयही सुटण्याची शक्यता आहे.

नगर : अंतीम परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना पास करून घेण्याचा निर्णयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेमुळे सध्या विद्यार्थी खुष आहेत. आता एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही पास करून घेण्याबाबत युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मागणी केली होती. त्याला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ट्विटरवरून ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे काही विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांचे शेवटच्या वर्षाबरोबरच इतर विषयही सुटण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांनी अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पास करण्याबाबत केलेल्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना सरासरी गुण मिळून त्यांचा पास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर तांबे यांनी एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्यासाठी मागणी केली होती. त्याला मंत्री तनपुरे यांनी ट्विवटर उत्तर दिले आहे.

तनपुरे यांनी म्हटले, ``प्रिय, सत्यजीत तांबे, काळजी नसावी,एटीकेटीविषयी आपली तळमळ मी समजू शकतो. विद्यार्थीदशेत मी बऱ्यापैकी स्टुडिअस विद्यार्थी असलो, तरी एटीकेटी असलेल्या मित्रांची मग ते माझ्या बॅचचे असोत, ज्युनिअर असोत वा बंधुतुल्य. काय मनःस्थिती असायची याची कल्पना मला आहे. कोणावर अन्याय होणार नाही, ही शासन काळजी घेईल.``

सत्यजीत तांबे यांनीही उत्तर देताना ट्टिवटरवर म्हटले, ``धन्यवाद दादा, स्वत: तुम्हीही इंजिनीअरींगचे विद्यार्थी असल्याने तुम्हाला या विद्यार्थी मित्र-मैत्रीणींच्या भावना समजणे साहजिकच आहे. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असल्याने तुम्हाला बॅकलाॅग व ए.टी.के.टीचेही महत्त्व माहितीच असणार. तेवढं ते पण मिटवून टाका म्हणजे झालं.``
ही सकारात्मक चर्चा एटीकेटी विद्यार्थ्यांना लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख