शासकीय कार्यालयांना विळखा ! पुरवठा अधिकारी, झेडपीतही कोरोना रुग्ण - Go to government offices, supply officers, corona patients in ZP | Politics Marathi News - Sarkarnama

शासकीय कार्यालयांना विळखा ! पुरवठा अधिकारी, झेडपीतही कोरोना रुग्ण

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 17 जुलै 2020

आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवलील पुरवठा अधिकारी कार्यालयात दोनजण बाधित आढळले. काल जिल्हा परिषदेत रुग्ण आढळला होता.

नगर :  नगर शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यामार्फत शहरात कोरोना फैलावण्याची भिती व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातून लोक कामानिमित्त या कार्यालयात येतात. मात्र कोरोना घेवून घरी जातात, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवलील पुरवठा अधिकारी कार्यालयात दोनजण बाधित आढळले. काल जिल्हा परिषदेत रुग्ण आढळला होता.

सध्या नगर शहरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. काल एकाच दिवशी 150 पेक्षा जास्त रुग्ण आढळले. त्यामुळे आता नगरचा औरंगाबाद होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. इतर तालुक्यांमध्येही रुग्ण आढळत असून, नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रुग्ण आढळू लागले आहेत. एकजरी रुग्ण आढळला तरी गाव बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत पातळीवर घेतला जात आहे.

आज आढळले 39 बाधित

जिल्ह्यात आज दुपारपर्यंत आलेल्या अहवालात 39 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. आज सकाळी आलेल्या अहवालानुसार पारनेर तालुक्यातील ताबळेवाडी 1, नांदूरपठार 1, पळसपूर 1 रुग्ण आढळले. भिंगार येथील 10, नगर तालुक्यातील 3 रुग्ण आढळले. त्यामध्ये वाकोडी 1, डोंगरगण 1 रुग्णांचा समावेश आहे. श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव 3, लोणी व्यंकनाथ 2 रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्या 1261 झाली असून, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 534 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 33 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बरे झालेल्यांची संख्या 794 झाली आहे.

हा भाग नवीन हाॅट स्पाॅट

तपोवन रोडजवळील वेदांत सहकाही गृह निर्माण संस्था, सूर्यनगर येथील जोशी, इथापे, सोनवणे यांच्या घराजवळील परिसर, महादेव मंदिर, सीमा बंगला, संत वामनभाऊ सार्वजिक वाचनालय, खुली जागा ते जोशी यांच्या घराचा परिसर हा कंटेेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. याजवळील परिलर सर्यनगर वसाहत, गिते वस्ती, लक्ष्मीनगर वसाहत सूर्यनगर वसाहत, तपोवन रस्ता आदी परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे.

दुसरा नवीन हाॅटस्पाॅक म्हणून तारकपूर परिसर सील केला आहे. राधास्वामी सत्संग भवन, पंजाबी हाॅल, कुमार काॅर्नर, राधास्वामी तत्संग भवन आदी परिसर कंटेेन्टमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. तसेच त्याच्या जवळील परिसर, नगर-मनमाड रोड, स्वामी विवेकानंद शाळा परिसर, तारकपूर वसाहत आदी भाग बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख