धनगर समाजास स्वतंत्र आरक्षण द्या : मधुकर पिचड - Give freedom reservation to Dhangar community: Madhukar Pichad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

धनगर समाजास स्वतंत्र आरक्षण द्या : मधुकर पिचड

शांताराम काळे
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

धनगर आदिवासी आहेत का, याची "टाटा' समितीमार्फत तपासणी करण्यात आली. त्यावेळी मी स्वतः कमिटीला सामोरे गेलो. विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर मी आदिवासी नाही, अशी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली.

अकोले : आदिवासी समाजाच्या हक्‍कांसाठी वयाच्या 80व्या वर्षीही रस्त्यावर आहे. पुढेही राहील. धनगर आरक्षणावर वेळोवेळी भूमिका स्पष्ट केली आहे. "त्यांना पुरणपोळी द्या; पण आमच्या गरीब आदिवासींच्या भाजी-भाकरीला हात लावू नका,' असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केले. 

घोरपडा देवी मंदिर, रंधा (ता. अकोले) येथे आयोजित कार्यक्रमात पिचड बोलत होते. इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, माजी आमदार वैभव पिचड, भारत घाणे, सरपंच पांडुरंग खाडे, विजय भांगरे, सुनील सरुक्ते, सुरेश गभाले आदी उपस्थित होते. सुरवातीला मधुकर पिचड व हेमलता पिचड यांच्या हस्ते घोरपडा देवीचे पूजन करण्यात आले. 

पिचड म्हणाले, ""धनगर आदिवासी आहेत का, याची "टाटा' समितीमार्फत तपासणी करण्यात आली. त्यावेळी मी स्वतः कमिटीला सामोरे गेलो. विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर मी आदिवासी नाही, अशी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. महादेव कोळी नव्हे, तर कोळी महादेव आदिवासी असल्याचा युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयात वाद गेल्यावर कोर्टानेच मी आदिवासी असल्याचे सांगितले. "टाटा' समितीने दिलेला अहवाल जाहीर करावा व आदिवासींचा आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण देण्यास आमची हरकत नाही.'' 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख