संजय राठोडांना बडतर्फ करा अन्यथा अधिवेशन रोखून धरू : विखे पाटील यांचा इशारा - Get rid of Sanjay Rathore, otherwise the convention will be stopped: Vikhe Patil's warning | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राठोडांना बडतर्फ करा अन्यथा अधिवेशन रोखून धरू : विखे पाटील यांचा इशारा

सतीश वैजापूरकर
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

अधिवेशनात सामान्य माणसांच्या प्रश्‍नांवर चर्चा व्हावी, ही सरकारची इच्छा नाही. कोरोना संकटात राज्यातील जनतेची महाविकास आघाडी सरकारने हेळसांड केली.

शिर्डी : धाक दडपशाहीने विजजोडण्या तोडून सामान्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळणारे दळभद्री सरकार राज्यात सत्तेवर बसले आहे. घोटाळे आणि भानगडींच्या प्रकरणातून एकमेकांना वाचविणे, एवढाच त्यांचा समान कार्यक्रम आहे. अर्थसंकल्पिय आधिवेशनापूर्वी मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची हिंमत सरकारने दाखवावी. अन्यथा भाजपचे लोकप्रतिनीधी आधिवेशन चालू देणार नाहीत, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

हेही वाचा... साई संस्थानच्या रुग्णालयात मोठे षडयंत्र

ते म्हणाले, की संशयास्पद मृत्यू झालेल्या पूजा चव्हाण हिला न्याय मिळवून देण्यासाठी गेलेल्या भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांना पुण्यातील पोलिसांनी दिलेली वागवणूक पाहाता पोलिसांवर मोठा राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट होते. घरात बसून केलेला कारभार चव्हाट्यावर येण्याची भिती असल्यानेच सरकार आधिवेशनाचा कालावधी कमी करून, चर्चेपासून पळ काढू पहात आहे. अधिवेशनात सामान्य माणसांच्या प्रश्‍नांवर चर्चा व्हावी, ही सरकारची इच्छा नाही. कोरोना संकटात राज्यातील जनतेची महाविकास आघाडी सरकारने हेळसांड केली.

हेही वाचा... जिल्हा बॅंकेची माळ कोणाच्या गळ्यात

बरेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीत मदतीच्या केवळ घोषणा झाल्या. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. मंत्र्यांनी वेळोवेळी विविध विभागात भरतीच्या घोषणा केल्या परंतू; एकाही विभागात नोकर भरतीची प्रक्रीया सुरू नाही. त्यामुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराष्याचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दाही न्यायालयीन प्रक्रीयेच्या नावाखाली सरकारने दुर्लक्षीत केला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभिर बनला आहे. कारागृहातून सुटलेले आरोपी शस्त्र हातात घेवून राजरोसपणे रस्त्यावर नाचत आहेत. सरकारमधील मंत्र्यांनाच पाठीशी घातले जात असेल, तर जेलमधून सुटलेले आरोपी असे प्रकार करणार त्यात नवल ते काय, असे ते म्हणाले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख