गाैरी गडाख यांची आत्महत्या? शवविच्छेदन औरंगाबादमधील रुग्णालयात - Gary Gadakh's suicide? Autopsy at a hospital in Aurangabad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

गाैरी गडाख यांची आत्महत्या? शवविच्छेदन औरंगाबादमधील रुग्णालयात

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

काल माहेरच्या मंडळींनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण उघड होणार आहे.

नगर : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून गाैरी प्रशांत गडाख (वय 35) यांचा मृतदेह काल सायंकाळी त्यांच्या नगर येथील य़शवंत काॅलनीतील घरात आढळून आला. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलसांनी व्यक्त केला आहे. त्यांचा मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला आहे.

(कै.) गाैरी यांचे माहेर लोणी (ता. राहाता) येथील विखे कुटुंबियांत आहे. काल माहेरच्या मंडळींनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण उघड होणार आहे.

गाैरी यांच्या मागे पती सामाजिक कार्यकर्ते व यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख, दोन मुली असा परिवार आहे. महाराष्ट्राचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या (कै.) गाैरी या भावजयी होत. या सर्व घडामोडींच्या दरम्यान गाैरी यांचे पती प्रशांत गडाख हे पुणे येथील एका रुग्णालयात दाखल असल्याचे समजते. 

काल सायंकाळी सातच्या दरम्यान घटना घडल्यानंतर गाैरी यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते, ताथापि, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर हाॅस्पिटलच्या प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी प्राथमिक तपास करून तोफखाना पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आज सकाळी त्यांचा मृतदेह औरंगाबाद येथील घोटी रुग्णालयात उत्तरीय तपासणी नेण्यात आला. नगर येथील रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदनाची सोय नसल्याने शवविच्छेदन औरंगाबाद येथे करण्याचा निर्णय प्रशासकीय यंत्रणेने घेतला.

गाैरी या लोणी येथील वसंतराव विखे पाटील यांच्या कन्या होत. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नात्यातील हे कुटुंब आहे. पती प्रशांत गडाख यांनी यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. राज्यात या प्रतिष्ठानची महती आहे. (कै.) गाैरी याही या कामात त्यांना सहकार्य करीत असत. महिलांविषयक उपक्रमांत त्या कायम आघाडीवर असत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख