गडाख शिवसेनेत अन क्रांतिकारी शेतकरी पक्ष गडाखांच्या पाठीशी - Gadakh Shiv Sena un-revolutionary peasant party backs Gadakh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

गडाख शिवसेनेत अन क्रांतिकारी शेतकरी पक्ष गडाखांच्या पाठीशी

विनायक दरंदले
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

'क्रांतिकारी 'च्या बॅट या चिन्हाने स्थानिक स्वराज्य निवडणुकीत धमाल उडवत सन २०१९ ची विधानसभा जिंकत सन २०१४ च्या पराभवाची परतफेड केली होती.

सोनई : जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची कार्यपध्दत व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना असलेली विकासकामांची आस लक्षात घेवून संपूर्ण क्रांतीकारी शेतकरी पक्ष शिवसेनेच्या शिवबंधनात राहील, असे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सतिश पालवे यांनी सांगितले. 

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गडाख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून अॅड.पालवे यांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला होता. 'क्रांतिकारी 'च्या बॅट या चिन्हाने स्थानिक स्वराज्य निवडणुकीत धमाल उडवत सन २०१९ ची विधानसभा जिंकत सन २०१४ च्या पराभवाची परतफेड केली होती. राजकीय समीकरणात 'क्रांतिकारी'ने शिवसेनेला विनाअट पाठिंबा दिला होता. 

काल गडाख यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधल्यानंतर आता क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे पुढे काय? हा प्रश्न काल आणि आज तालुक्यात चर्चेत होता. अॅड. पालवे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सात वर्षात गडाख परिवाराचा चांगला अनुभव आल्याचे सांगितले. समाजातील सर्व घटकांसाठी त्यांची धडपड असते. यामुळे पक्षाचे सर्व कार्यकर्ते आता शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून काम करतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. 

Edited By - Murlidhar Karale
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख