गडाख हेच आमचा पक्ष ! नेवासेमधील हा समाज शिवसेनेशी एकवटला - Gadakh is our party! This community in Nevasa united with Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

गडाख हेच आमचा पक्ष ! नेवासेमधील हा समाज शिवसेनेशी एकवटला

सुनिल गर्जे
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

शिवसेना प्रवेशानंतर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे नेवासे शहरात मुस्लिम समाजाच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय संघटनांकडूनही मंत्री गडाखांचे सत्कार करण्यात आला. 

नेवासे : "मंत्री शंकरराव गडाख हेच आमचा पक्ष आणि संघटना आहे. आम्ही सर्व मुस्लिम समाज एकजुटीने त्यांच्याच पाठीशी कायम आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाचे आम्हाला स्वागत करतो. नेवासे तालुक्याच्या विकासासाठी ती गरजच होती.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाआघाडी सरकारचे काम कौतुकास्पद आहे,`` असे मुस्लिम युवा नेते असिफ पठाण यांनी सांगून नेवासे तालुक्यातील हा समाज गडाखांच्या पाठिशी एकवटला असल्याचे सूचक वक्तव्य केले.

निमित्त होते गडाख यांच्या गाव भेटीचे. शिवसेना प्रवेशानंतर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे नेवासे शहरात मुस्लिम समाजाच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय संघटनांकडूनही मंत्री गडाखांचे सत्कार करण्यात आला. गडाख यांनी शिवसेनेत प्रवेशानंतर तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्या, मात्र नेवासे शहरातील त्यांचे स्वागत काही वेगळेच ठरले. 

मंत्री शंकरराव गडाख यांचे आगमन होताच त्यांचा शिवसेना प्रवेशबद्दल मुस्लिम समाजाच्यावतीने ज्येष्ठ नेते गफूर बागवान, युवानेते असिफ पठाण, अब्दुल्ला बागवान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक ऍड. काकासाहेब गायके, बाळासाहेब कोकणे, सुलेमान मणियार,  नारायण लोखंडे, पंकज जेधे उपस्थित होते. 

या वेळी मंत्री गडाखांनी उपस्थित प्रत्येक कार्येकर्त्यांशी संवाद साधून कोरोना महामारीच्या विरोधीतील लढ्यात सर्वांनी सरकारला सहकार्य करण्यासाठी नियमांचे पालन करून स्वतः बरोबरच परिवार व समाजाची काळजी घेण्याचे आवाहन केले. या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, शेतकरी संघटना, आरपीआय, लहुजी सेना या राजकीयसह विविध सामाजिक संघटनांनी मंत्री शंकरराव गडाख यांचा सत्कार केला. 

गफूरभाईंचा 'जय महाराष्ट्र'

मंत्री गडाखांचा शिवसेना प्रवेश झाल्यानंतर संपूर्ण नेवासे तालुका 'जय महाराष्ट्र' मय झाला. तेव्हापासून गडाखांचा कार्येकर्ता असो की, चाहता नाहीतर विरोधक हे सर्व एकमेकांच्या भेटीप्रसंगी  'जय महाराष्ट्र'च म्हणणार. त्याचा प्रत्येय मंत्री गडाख यांना आला. मुस्लिम ज्येष्ठ नेते गफूर बागवान हे कार्यालयात येताच मंत्री गडाखांसह उपस्थितांना 'जय महाराष्ट्र' म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख