गडाख, तनपुरे यांना या `राजकीय पैलवाना`ने दिले व्यायामाचे धडे

गडाख व तनपुरे यांनी आज मुरकुटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या व्यायमशाळेची पाहणी केली. मुरकुटे रोज किती व्यायाम करतात, कसा करतात, त्यांच्या उत्तम तब्येतीचे रहस्य काय, असे प्रश्न विचारून त्यांनी मुरकुटे यांच्याकडून धडे घेतले.
2Murkute_20swims.jpg
2Murkute_20swims.jpg

श्रीरामपूर : व्यायामाशिवाय पर्याय नाही. कोरोनाच्या काळात व्यायाम लाभदायी आहे. आपणही नियमित व्यायाम करा, असा सल्ला माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिला.

गडाख व तनपुरे यांनी मुरकुटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या व्यायमशाळेची पाहणी केली. मुरकुटे रोज किती व्यायाम करतात, कसा करतात, त्यांच्या उत्तम तब्येतीचे रहस्य काय, असे प्रश्न विचारून त्यांनी मुरकुटे यांच्याकडून धडे घेतले.

वयाच्या ७९ व्या वर्षी आजही आपण नियमित व्यायाम करतो. निवास्थानातील व्यायाम शाळेत जावून रोज पहाटे एक तास व्यायाम करतो. त्यानंतर क्रीडा मैदान परिसरात सायकल वरुन फेरफटका मारुन धावतो. त्यामुळे आजही आपले आरोग्य चांगले असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले.

शरिरासाठी आराम हा हराम असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आपण सातत्याने नियमित व्यायाम करायला पहिजेत. रोजचे काम वेळेवर करायला पाहिजे. आपण प्रत्येक रविवारी शेतात जावून शेतीची कामे करतो. शेतात काम केल्याने मनाला समाधान वाटते. आजचे अनेक शेतकरी शेतात जात नाही. शेतात काम करण्यास पुढाकार घेत नाही, असे मुरकुटे यांनी सांगितले.

मुरकुटे म्हणाले, राज्यातील अनेक मंत्री महोदयांना आपल्या घरातील व्यायाम शाळेचा पाहणी करुन व्यायामाचे महत्व पटवून दिले. निरोगी आरोग्यासाठी आपल्या वयानुसार रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटात सर्वांना व्यायाम आणि आरोग्याचे महत्व कळाले. त्यामुळे कोरोनाच्या संकटावर मात करायची असेल, तर नियमित व्यायाम करणे आवश्यक आहेत. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आरोग्यासाठी लाभदायी असल्याचा सल्ला त्यांनी दिला.

साखर कारखान्यापेक्षा मुरकुटे यांची व्यायामशाळा महत्त्वाची

माणसाने आयुष्याच्या शेवटपर्यंत काम केले पाहिजे. त्यामुळे अनेकदा विविध मंत्र्यांसह अनेकांना व्यायाम करण्यास प्रोत्साहीत करण्याचे कार्य करतो. माझा व्यायामाचा सल्ला ऐकायचा असेल तर ऐका, असे त्यांनी सांगितले. त्यावर मंत्री गडाख म्हणाले, की साखर कारखाने सर्वांकडे आहेत. परंतू माजी आमदार मुरकुटे यांच्याकडे आपली व्यायामशाळा आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षीही त्यांनी आपले आरोग्य उत्तम ठेवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपणही नियमित व्यायाम करतो. आपल्याला माहित नाहीत. आपण वयाच्या ७० ते ८० वर्षापर्यंत मुरकुटे यांच्यासारखा आपण व्यायाम करु शकणार की नाही. परंतू व्यायाम करणे सर्वांना गरजेचे असून, मुरकुटे यांचे मार्गदर्शन मोलाचे असल्याचे मंत्री गडाख यांनी स्पष्ट केले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com