फुंडकर फळबाग लागवडीचे उद्दिष्टय राज्यात शुन्य ! रोहित पवार यांनी लक्ष घालावे - Fundkar orchard cultivation objective in the state is zero! Rohit Pawar should pay attention | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

फुंडकर फळबाग लागवडीचे उद्दिष्टय राज्यात शुन्य ! रोहित पवार यांनी लक्ष घालावे

वसंत सानप
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

प्राप्त उद्दिष्टाहून अधिक क्षेत्र लागवडी खाली आले. मात्र यावर्षी ही योजना लालफितीच्या निर्णयामुळे अडगळीत पडली आहे.

जामखेड : नोव्हेंबर उजडला पण राज्य शासनाच्या माध्यमातून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आले नाही. साहजिकच या योजने अंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या व लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या आडचणीत वाढ झाली आहे.

बहुभुधारक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारी ही योजना या वर्षी राज्यभर राबविली गेली नाही. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लक्ष घालावे, त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला, तर काहीतरी हालचाल होऊ शकेल, व त्याचा लाभ संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना होईल, अशी अपेक्षा नगर जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.

या योजनेसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा शिगेला पोहचली आहे. तसेच गेल्या पाच महिण्यांपासून आॅनलाईन सूक्ष्मसिंचनचे प्रस्ताव स्विकारले जात नाहीत, यामध्ये आमदार रोहित पवार यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होते आहे.

दरवर्षी जून महिन्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा प्रारंभ होतो. सुक्ष्मसिंचन योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव आॅनलाईन दाखल करून घेतले जातात. यावर्षी मात्र तब्बल पाच महिण्यांपासून शेतकरी या दोन्ही योजनेची वाट पहात आहेत. मात्र योजनेचे उद्दिष्ट आलेले नसल्याने प्रारंभ होऊ शकला नाही.

दरवर्षी जामखेड तालुक्यात भाऊसाहेब फुंडकर फळभाग लागवड योजनेंतर्गत आंबा, लिंबू, डाळिंब, संत्रा व इतर फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. प्राप्त उद्दिष्टाहून अधिक क्षेत्र लागवडी खाली आले. मात्र यावर्षी ही योजना लालफितीच्या निर्णयामुळे अडगळीत पडली आहे. आणि शेतकऱ्यांची मोठी आडचण झाली आहे. या योजनेंतर्गत यार्षी फळबाग लागवड करायची म्हणून खरिपाची पेरणी केली नाही आणि आता रब्बीचीही पेरणी झाली नाही. फळबाग लागवडही करता आली नाही, अशा आडचणीत काही शेतकरी सापडले आहेत. आता तर प्रतीक्षा करताना हंगाम संपत आला आहे. नोव्हेंबर उजडला, पण योजनेचे उद्दिष्ट आलेले नाही. त्यामुळे  क्रषी विभागाने शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल करून घेतलेले नाहीत. ही आडचण सोडवण्यासाठी आमदार रोहित पवारांनी प्रयत्न करावेत आणि दरवर्षीपेक्षा अधिकचे उद्दिष्ट आंबा, संत्रा, लिंबू, सिताफळ, पेरु या इतर सर्व प्रकारच्या फळबागांसाठी मंजूर करून घ्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

यासंदर्भात क्रषी विभागाशी संपर्क साधला असता तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी सांगितले, की भाऊसाहेब फुंडकर क्रषी योजनेंतर्गत तालुक्यासाठी 'उद्दिष्ट 'आलेले नाही.

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख