नेवासे तालुक्यात ग्रामपंचायत सदस्यावर मित्राकडूनच गोळीबार - A friend of a Gram Panchayat in Nevasa taluka was shot dead by a friend | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

नेवासे तालुक्यात ग्रामपंचायत सदस्यावर मित्राकडूनच गोळीबार

विनायक दरंदले
बुधवार, 16 जून 2021

गोळीबारात चव्हाण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोनई : आंतरराष्ट्रीय किक बाॅक्सर व बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य संकेत भानुदास चव्हाण (वय २५) यांच्यावर कांगोणी फाटा (ता. नेवासे) (Newase) परिसरात दोन जणांनी गावठी पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. गोळीबारात चव्हाण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले. (A friend of a Gram Panchayat in Nevasa taluka was shot dead by a friend)

याबाबत शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी, की मंगळवारी (ता. १५) रात्री साडेनऊ वाजता चव्हाण हे काम आटोपून घोडेगावातून घरी जात होते. ते कांगोणी फाट्यापासून काही अंतरावर थांबले असता, दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गावठी पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. या गोळ्या खांदा, पाठ व कमरेखाली लागल्याने चव्हाण गंभीर जखमी झाले.

गोळीबाराचा आवाज आल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी जखमी चव्हाण एका चरात पडलेले होते. त्यांनी चव्हाण यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. भानुदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन बाळासाहेब भाऊसाहेब हापसे व विजय विलास भारशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळाला शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागूल व पथकाने पंचनामा केला. हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, अन्यथा नगर-औरंगाबाद रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छावा क्रांती संघटनेचे अशोक चव्हाण, तालीम संघाचे संदीप कर्डिले व स्वप्नील वारुळे यांनी दिला.

मित्रांनीच केला गोळीबार

जखमी संकेत चव्हाण व आरोपी चांगले मित्र होते. ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात ते एकत्र सक्रिय होते. आरोपी हापसे व भारशंकर पूर्वी शनिशिंगणापुरात
पूजासाहित्य विक्रीचा व्यवसाय करत होते. मात्र असे काय घडले, की त्यांनी मित्रावरच गोळीबार केला, याचा शोध पोलिस घेत आहेत.  
 

हेही वाचा..

मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख