कर्जत-जामखेडमध्ये या कामांसाठी मिळणार मोफत जेसीबी

आपण विविध संस्थांच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. मात्र या कामी लोकसहभाग मिळणे फार गरजेचे आहे. या माध्यमातून निश्चितपणे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रस्ते करता येतील.
jcb.png
jcb.png

जामखेड : वर्षानुवर्षे मागणी होऊनही शासनाच्या कोणत्याच निधीतून जे रस्ते करता येत नाहीत, ते गाव पातळीवरील विविध प्रकारचे 'पानंद रस्ते व शेतरस्ते ' करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या सहकार्यातून जामखेड व कर्जतसाठी पन्नास जेसीबी मशिन मिळणार आहेत. विशेष म्हणजे त्याचे कोणतेही बिल काढण्यात येणार नसून, ते मोफत देण्याची व्यवस्था होणार आहे. 

जामखेड येथे जिल्हा प्रशासन भारतीय जैन संघटना, नाम फाउंडेशन व कर्जत-जामखेड यांच्या पुढाकाराने एकात्मिक विकास संस्था प्रणित परिवर्तन पर्व एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प अंतर्गत जलसंधारण जलव्यवस्थापन पानंद रस्ता गाव पातळीवरील शेत रस्ते या योजनेचा प्रारंभ नुकताच आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांनी पानंद रस्त्यांबाबत माहिती दिली. या वेळी उपजिल्हाधिकारी हिचवे, उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब पाटील, तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी पी.पी कोकणी, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे आदींसह तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख कर्मचारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मदार पवार म्हणाले, की आपण विविध संस्थांच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. मात्र या कामी लोकसहभाग मिळणे फार गरजेचे आहे. या माध्यमातून निश्चितपणे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रस्ते करता येतील. आपण स्वतः यासाठी कर्जतला पंचवीस आणि जामखेडला ही पंचवीस जेसीबी मशीन देत आहोत, त्या मशिनने केलेल्या कामाची बीलं काढली जाणार नाहीत. ते मोफत असतील.

पानंद रस्ते व शेतरस्ते ही योजना अधिकारी-कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नातून राबविण्यात येणार आहे. त्याच बरोबर जलसंधारणची कामेही करता येतील. यासाठी तालुका समन्वयक हे आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना संपर्क करून उपक्रमाची माहिती देतील. यासाठी तालुकास्तरावर एक समिती असेल. तालुका समन्वयक गावचे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्याशी समन्वय ठेवून येणाऱ्या मागणीनुसार त्यात या गावांना भेटी देऊन कामांच्या ठिकाणाची माहिती घेतील आणि जर काम करण्यायोग्य परिस्थिती असेल, लोकसहभागातून एक मताने नागरिक व ग्रामस्थ समिती सदर काम पूर्ण करण्यात सहभागी होत असेल, तर सर्वेक्षणाअंती तसा अहवाल तालुकास्तरीय समितीकडे सादर करतील.

सर्व भागधारकांना याबाबत माहिती देऊन त्यास मान्यता देण्यात येईल. मान्यता झाल्यानंतर व ग्रामपंचायतीशी मशिनच्या बाबत करार करण्यात येईल. हा करार अस्तित्वात आल्यानंतर गावात काम करण्यासाठी मशीन पाठवले जाईल. हे काम सुरू असताना त्या कामाची देखरेख आणि मशीनची जुजबी देखभाल करण्यासाठी गावातील एक ग्राम समन्वयक म्हणून ग्राम समिती काढून नेमली जाईल. मशिनद्वारे हे काम पूर्ण झाल्यावर त्या कामाचा पूर्णत्वाचा दाखला घेऊन मशीन परत घेण्यात येईल. लोकसहभागातून आणि लोकांच्या मागणीनुसार होणाऱ्या सर्व कामावर लोकांचे तसेच समितीचे नियंत्रण असेल.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com