`केदारेश्वर`च्या सभासदांना चार हजार नुकसान भरपाई, अध्यक्ष ढाकणे यांचा निर्णय - Four thousand compensation to the members of 'Kedareshwar', decision to cover the president | Politics Marathi News - Sarkarnama

`केदारेश्वर`च्या सभासदांना चार हजार नुकसान भरपाई, अध्यक्ष ढाकणे यांचा निर्णय

सचिन सातपुते
रविवार, 21 मार्च 2021

या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करुन आणलेली पिके लहरी हवामान ओरबडून घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शेवगाव : तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण तयार झाले. काल सायंकाळी तालुक्यातील पुर्वेकडील बोधेगाव, लाडजळगाव, गोळेगाव, आखेगाव, शेकटे कुर्द व बुद्रुक, सुकळी आदी गावातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करुन आणलेली पिके लहरी हवामान ओरबडून घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बोधेगाव व परिसरातील पिकांचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करुन केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांना प्रत्येकी चार हजार रुपयांची मदत जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला.

हेही वाचा.. सीताराम गायकर यांचे पिचडांचे काम केलेच नाही

विजेच्या कडकटासह व वादळी वाऱ्यासह काल अवकाळी पावसाने तालुक्यातील पुर्वेकडील बोधेगाव, लाडजळगाव, गोळेगाव, आखेगाव, शेकटे कुर्द व बुद्रुक, सुकळी आदी परीसराला झोडपले. या परिसरात गहू, ऊस, हरभरा, मका, उन्हाळी पिके बाजरी, भुऊमुग, कांदा या पिकांसह पपई व इतर फळबांगाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे एका तासातच शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करुन पिकविलेल्या पिकांवर पाणी फिरले आहे. गव्हाचे पीक भिजल्याने पिकाचा रंग बदलून दर्जा घसरणार आहे. केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॅड.प्रताप ढाकणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद असलेल्या नुकसानग्रस्त शेतक-यांना प्रत्येकी चार हजार रुपयांची तातडीने आर्थिक मदत जाहीर केली. तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान झालेले असल्यास त्या ऊसाला त्वरीत ऊसतोड देण्याचे ही शेतकऱ्यांनी आश्वासन दिले. तसेच तालुका कृषी अधिकारी किरण मोरे यांना या भागातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची ढाकणे यांनी विनंती केली.

हेही वाचा... साकळाई थेट संसदेत

या वेळी केदारेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश घनवट, लाडजळगावचे काकासाहेब तहकीक, भाऊसाहेब क्षीरसागर, उपसरपंच दत्ता तहकीक, गहिनीनाथ ढाकणे, तात्यासाहेब मारकंडे, संजय आंधळे, रंगनाथ परदेशी, राजेंद्र मारकंडे, विक्रम ढाकणे आदी शेतकरी व तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, कृषी सहाय्यक सुभाष बारगजे, गजानन चव्हाण, कामगार तलाठी बाबासाहेब अंधारे आदी उपस्थित होते.

बोधेगाव व परिसरामध्ये पावसाळ्यातही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अॅड. ढाकणे यांनी पाहणी केली. तसेच पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली होती. आज ही या भागात झालेल्या नुकसानाची त्वरीत पाहणी करुन कार्यक्षेत्रातील सभासद असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी चार हजार रुपयांची तातडीने आर्थिक मदत जाहीर केल्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख