माजी आमदार भाऊसाहेब कांबळे कोरोना बाधित - Former MLA Bhausaheb Kamble disrupted Corona | Politics Marathi News - Sarkarnama

माजी आमदार भाऊसाहेब कांबळे कोरोना बाधित

गाैरव साळुंके
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना मागील काही दिवसांपासून त्रास होत असल्याने त्यांनी काल रॅपीड तपासणी केली. त्यात ते कोरोना पाॅजिटिव्ह आढळून आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. 

श्रीरामपूर : येथील माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना मागील काही दिवसांपासून त्रास होत असल्याने त्यांनी काल रॅपीड तपासणी केली. त्यात ते कोरोना पाॅजिटिव्ह आढळून आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. 

येथील संतलुक रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यांना त्रास होत असल्याने त्यांनी फॅमिली डॉक्टरांकडून औषधोपचार घेतला. परंतू प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांनी अखेर काल ग्रामीण रुग्णालयात जाऊन रॅपीड तपासणी केली. त्यात यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना तातडीने संतलुक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आरोग्य विभागाने आज आमदार कांबळे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा मंदाताई कांबळे यांचीही कोरोना तपासणी केली. त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे कळाले. 
खबरदारी म्हणून आमदार कांबळे यांचे चिरंजीव नगरसेवक संतोष कांबळे, संदीप कांबळे यांचीही तपासणी केली असता ते सर्वजण निगेटिव्ह आले आहे. येथील संतलुक रुग्णालयात सध्या अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरु आहे.

आमदार कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रकृती उत्तम असून, येथे मिळत असलेल्या उपचार सुविधाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच नागरिकांनी प्रशासकीय नियमांचे पालन करुन काळजी घेण्याचे आवाहन केले. 
 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख