Flower showers from citizens on officials | Sarkarnama

प्रवरासंगमजवळ नागरिकांच्या पृष्पवृष्टीने हरकले `कोरोना विरोधी योद्धे`

सुनील गर्जे
बुधवार, 29 एप्रिल 2020

कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी नगर-औरंगाबाद सीमा माध्यवधी असलेल्या महामार्गावरील प्रवरसंगम येथे जिल्हा तपासणी कक्ष उभारण्यात आला आहे.

नेवासे : नगर-औरंगाबाद सीमेवरील प्रवरासंगम येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर कर्तव्य बजावणाऱ्या महसूल, पोलीस व आरोग्य  विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नागरिकांनी पुष्पवृष्टीचा वर्षाव करून कृतज्ञाता व्यक्त करीत सर्वांचे आभार मानले.  

कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी नगर-औरंगाबाद सीमा माध्यवधी असलेल्या महामार्गावरील प्रवरसंगम येथे जिल्हा तपासणी कक्ष उभारण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिस, महसूल, ग्रामविकास आणि आरोग्य विभागाच्यावतीने पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या मार्गावरून औरंगाबादहून नगर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची व त्यातील नागरिकांची तपासणी होते. 

दरम्यान, तपासणीत पथकाकडून कसून तपासणी करूनच संबंधित वाहनाला नगर जिल्ह्यात प्रवेश देण्यात येतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी आव्हानात्मक ठरत आहे. कोरोनाचा धोका पत्कारून सेवा बजावणाऱ्या नेवाशाचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर शिंदे, हेड कॉस्टेबल विठ्ठल गलधर, सतीश देसाई, केवल राजपूत, कामगार तलाठी बाबाजानी शेख, दत्तात्रय शिंदे, सुनंदा इंगळे, सुनील जाधव, उषा नजन यांच्यावर पुष्पवृष्टी करून या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नागरिकांनी कृतज्ञाता म्हणून सत्कार केला.  

सत्कारामुळे अधिक स्फुर्ती मिळाली
नागरिकांनी जिल्हा तपासणी कक्षावर चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करून आमचा सत्कार केला. कर्तव्य वाजविणे हे आमचे कर्तव्यच आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात शासन, प्रशासनासह आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचेही तेवढेच योगदान आहे. आमच्यावर केलेली पुष्पवृष्टी व सत्कार हे आम्हाला प्रेरणा व उत्साह देणारे आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून घरी व सुरक्षित राहावे,  असे आवाहन नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी केले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख