मराठा आरक्षणासाठी नगरमधून पाठविणार पाच लाख पत्र

राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या सूचनेनुसार व जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातून पाच लाख पत्रे पाठविणार.
Maratha morcha.jpg
Maratha morcha.jpg

संगमनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) स्थापना दिवसानिमित्त गुरुवारी (ता. १०) मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातून एक कोटी पत्रे पाठविण्याचा संकल्प केला आहे. (Five lakh letters to be sent from the city for Maratha reservation)

या संकल्पपूर्तीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. यासाठी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या सूचनेनुसार व जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातून पाच लाख पत्रे पाठविणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कपिल पवार व कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी दिली.

हेही वाचा..

56 व्या वर्षी खात्यांतर्गत सरळ परीक्षेतून उपनिरीक्षक

संगमनेर : लहानपणापासून पाहिलेल्या फौजदार होण्याच्या स्वप्नांच्या पूर्तेतेसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना अखेर यश मिळाले. पर्यावरण क्षेत्रात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात केलेल्या भरीव कामगिरीनंतर पोलीस दलात शिपाई म्हणून दाखल झालेल्या विजय खंडीझोड यांनी खात्यांतर्गत सरळ परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत केलेला प्रवास प्रेरणादायी आहे.

पदव्युत्तर शिक्षणानंतर 1986 ते 88 या काळात मुंबईतील कासा या पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक वनिकरणाची जबाबदारी सांभाळली. या दरम्यान त्यांनी संगमनेरच्या बाळेश्वरच्या डोंगररांगात केलेले वृक्षारोपण आजही त्यांच्या कामाची साक्ष देते आहे. फौजदार होण्याच्या पाहिलेल्या स्वप्नाच्या पूर्तेतेसाठी कुटूंबात झालेल्या संस्काराची शिदोरी घेवून 1989 साली ते पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झाले.

आजवरच्या 33 वर्षांच्या सेवेत त्यांनी नगरच्या जिल्हा विशेष शाखा, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, संगमनेर शहर व तालुका अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी काम केले. गुन्हेगारांमधील गुन्हेगारी वृत्ती संपवण्यासाठी केलेल्या पोलिसींग मधून अनेकांना जीवनाचा चांगला मार्ग त्यांनी दाखवला. पूर्ण निर्व्यसनी असलेल्या खंडीझोड यांनी आयुष्यात कोणाच्याही डोळ्यात पाणी येवू देवू नकोस ही गुरुंची शिकवण जीवनात पदोपदी अंगीकारली.

कर्तव्यात कसूर हा शब्दही गावी नसलेल्या खंडीझोड यांचा उत्कृष्ट तपासी अधिकारी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधिक्षक आदींनी गौरव केला आहे.

आपल्या जीवनात अगदी लहानपणी ठरविलेले ध्येय साधण्यासाठी त्यांनी 2013 साली राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दिली आणि त्यात ते चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाले. त्यानंतर खात्यातंर्गत सरळसेवा परीक्षा देवून त्यात यश मिळवीत त्यांनी वयाच्या 56 व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक होवून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात हजरही झाले आहेत. त्यांची ही यशोगाथा इतरांसाठी प्रेरणादाय़ी आहे.

हेही वाचा..


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com