घाबरू नका, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही : पांडुरंग बरोरा - Fear not, the tribal reservation will not be affected : pandurang barora | Politics Marathi News - Sarkarnama

घाबरू नका, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही : पांडुरंग बरोरा

शांताराम काळे
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

आपण जागृत राहणे, ही काळाची गरज आहे. आपल्या आदिवासी समाजाच्या रुढी परपरा चाली रिती संस्कृती टिकवण्यासाठी आपण एकसंघ राहणे आवश्यक आहे.

अकोले : आदिवासी समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने सातत्याने सामाजिक हल्ले होत असून, काही समाज हा आदिवासी समाजाच्या आरक्षणावर डोळा ठेऊन आहे. आदिवासी समाज वेगळा आहे. टाटा संस्थेच्या. अहवालात हे स्पष्ट झाले असून, ठाकरे सरकार हे सर्व सामान्य नागरिकांचे सरकार आहे. या राज्यातील एकाही समाजावर अन्याय होणार नाही, याचा विश्वास आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणताही प्रकारचा धक्का लागणार नाही, असा विश्वास शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी व्यक्त केला.

आपण जागृत राहणे, ही काळाची गरज आहे. आपल्या आदिवासी समाजाच्या रुढी परपरा चाली रिती संस्कृती टिकवण्यासाठी आपण एकसंघ राहणे, आवश्यक आहे.

हेही वाचा... शंकरराव गडाखांच्या या वक्तव्यामुळे शक्षक मंडळी खूष

अकोले येथील चीचोंडी येथे महाराष्ट्रातील आदिवासी ठाकर समाजातील मधे आडनावाच्या कुळाचे कुल दैवत श्री भैरनाथनथाचे मंदिर आहे. राज्यातील मधे आडनावाचे नागरिक चीचोंडी येथे धार्मिक कार्यक्रमाचे निमित्ताने दिड वर्षातून एकत्र येत असतात. या निमित्ताने गतवर्षी देखिल मधे आडनावाच्या कुळातील हजारो नागरिक येथे आले होते, रात्री या मंदिरात जगरणाचा कार्यक्रम झाला. सकाळी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या प्रसंगी बरोरा मार्गदर्शन करीत होते.

ते म्हणाले, की आदिवासी समाजाची खरी रुढी परंपरा चालीरिती संस्कृती टिकवण्याचे काम अकोले तालुक्यातील घाटघर, पांजरे, उडदावने, चीचोंडी या परीसातील प्रमुख गावांमध्ये दिसून येथे वेगवेगळ्या सामाजिक ,धार्मिक, लग्न सोहळा, दशक्रिया विधी यादी उपक्रमांमध्ये या जुन्या पद्धती दिसून येतात. काळाच्या ओघात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी या जुन्या पद्धती नामशेष होत चालल्या आहेत. मात्र त्या परंपरा जोपासण्याचे काम आपण करीत असून, या चालीरिती परंपरा कायम टिकविण्यासाठी आपली एकी कायम ठेवा.

हेही वाचा... माझे वाढलेले महत्त्व काहींना रुचले नाही ः कर्डिले

समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी या परिसरात पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून मोठी संधी आहे, घाटघर चोंढे, शहापूर, मुंबई हा रस्ता होण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. मागील काही दिवसांपूर्वी या रस्त्याची पाहणी केली आहे. हा रस्ता होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे घातले असून, लवकर हा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत त्यांनी दिले.

माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड यांनी सांगितले, की आदिवासी समाजाची संस्कृती टिकविण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या भागात जे कलापथक आहेत. त्यात कामडी, ढोल पथक, महिलांचे फुगडी डान्स, टिपरी डान्स हे सगळे कलापथके असल्याने या भागात आपली आजही जुनी संस्कृती परंपरा कायम टिकून आहे. त्या कलाकारांना प्रोत्साहन देत जा आपले कलाकार जपा, असे अवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी मारुती मेंगाळ, संदीप मेंगाळ, सुधाकर मेंगाळ, भरत गिऱ्हे, हनुमंता पथवे, चिमाजी मधे, सोमा मधे, यासाहित आदी ग्रामस्थ उपस्थित होते 

 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख