शेतकरी हे पाकिस्तानी नाहीत ! अण्णा हजारे यांची केंद्र सरकारवर टीका - Farmers are not Pakistanis! Anna Hazare's criticism of the central government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

शेतकरी हे पाकिस्तानी नाहीत ! अण्णा हजारे यांची केंद्र सरकारवर टीका

मार्तंड बुचुडे
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

शेतकऱ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे असून, निवडणुका आल्या की शेतकऱ्यांच्या बांधावर मते मागण्यासाठी जाणारे, इतकेच काय शेतात शेतकऱ्यांबरोबर काम करण्याचेही नाटक करणारे नेते आता गप्प का आहेत.

पारनेर : अनेक दिवसांपासून सुरू असलेले दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन सरकार दडपण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी हे पाकिस्तानी नाहीत. त्यांच्याबरोबर चर्चा करायला सरकारला काय हरकत आहे, असा प्रश्न करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

हजारे म्हणाले, की शेतकऱ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे असून, निवडणुका आल्या की शेतकऱ्यांच्या बांधावर मते मागण्यासाठी जाणारे, इतकेच काय शेतात शेतकऱ्यांबरोबर काम करण्याचेही नाटक करणारे नेते आता गप्प का आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत, हे जाणून घेऊन सरकारला त्यांच्यासोबत चर्चा करायला काय हरकत आहे, असा प्रश्न केंद्र सरकारला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी करीत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबाही व्यक्त केला.

कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर हजारे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. निवडणुकांच्या वेळी शेतकऱ्यांच्या समस्या दिसतात. त्यांच्या भेटी-गाठी घेण्यासाठी थेट त्यांच्या शेतात त्यांच्या घऱी जाता, मग आता त्यांच्या मागण्यांबाबत त्यांच्या बरोबर चर्चा का करत नाहीत. हे शेतकरी काही पाकिस्तानी नाहीत, असेही हजारे सरकारवर टीका करताना म्हणाले.

केंद्र सरकारने या शेतकऱ्यांसोबत चर्चा करणे गरजेचे आहे. दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माझा पूर्णपणे पाठिंबा असल्याचेही हजारे यानी या वेळी सांगितले. शेतक-यांना केंद्र सरकार देत असलेल्या वागणुकीवर ही हजारे यांनी जोरदार टीका केली. 

शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना हजारे म्हणाले, की कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला सरकारकडून दिली जाणारी वागणूक चुकीचीच आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर मते मागायला जाता. मग त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी चर्चा का करत नाही?

दिल्ली येथे शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत. एक शेतकरी शहीद देखील झाले आहेत. आज शेतकरी संयमाने आंदोलन करत आहे. भविष्यात  हिंसात्मक आंदोलन सुरू झाले, तर कोण जबाबदार कोण? असा प्रश्न हजारे यांनी या वेळी केला.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख