बनावट डिझेल प्रकरण ! शिवाजी कर्डिले यांचा रोख कोणत्या नेत्यावर - Fake diesel case! Shivaji Kardile's cash on which leader | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

बनावट डिझेल प्रकरण ! शिवाजी कर्डिले यांचा रोख कोणत्या नेत्यावर

मुरलीधर कराळे
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

नगर जिल्ह्यातील बनावट डिझेलबाबत पोलस पथकाने कारवाई करून 15 दिवसांचा कालावधी उलटला आहे. असे असताना या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही.

नगर : जिल्ह्यातील बनावट डिझेलप्रकरणाचा तपास रेंगाळला असून, राजकीय दबावामुळे तपास लागत नसल्याची तक्रार माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली आहे. या प्रकरणाच्या सुत्रधारास राजकीय आशिर्वाद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा राजकीय नेता कोण, याबाबत त्यांनी स्पष्ट केले नसले, तरीही त्यांचा रोख अप्रत्यक्षरित्या `राहुरीकरांकडेच` असल्याचे सांगितले जाते.

पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात कर्डिले यांनी म्हटले आहे, की नगर जिल्ह्यातील बनावट डिझेलबाबत पोलस पथकाने कारवाई करून 15 दिवसांचा कालावधी उलटला आहे. असे असताना या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. यापूर्वीही नाप्ता भेसळ प्रकरणाचा तपास अपूर्ण आहे. या प्रकरणांत राजकीय हस्तक्षेप होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणत्या दबावाला बळी न पडता या प्रकरणाचा तपास लावून मुख्य सुत्रधाराला अटक करावी. जिल्ह्यात या प्रकरणाचे मोठे रॅकेट असून, त्यामध्ये मोठा राजकीय हस्तक्षेप आहे. त्यामुळेच बनावट डिझेल खुलेआम होत आहे. राजकीय दबावापोटी या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक होत नसल्याने भेसळ प्रकरणाचा तपास निःपक्षपद्धतीने व्हावा, अशा मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

कर्डिले यांनी का घातले लक्ष

दरम्यान, कर्डिले यांनी राजकीय दबावाचा उल्लेख केला आहे. त्यांचा रोख कोणावर, अशी चर्चा होत आहे. असे असले, तरी या प्रकरणाचे `राहुरी कनेक्शन` असल्याची चर्चा सुरू झाली असून, कर्डिले यांनी हा मुद्दा उचलून धरल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणी मुख्य सुत्रधाराला येत्या दहा दिवसांत अटक झाली नाही, तर प्रसंगी उपोषणासारखे आंदोलन करू, असा इशाराही कर्डिले यांनी दिला आहे. या  प्रकरणी मागणीचे निवेदन त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तसेच इतर मंत्र्यांना दिले आहे. या वेळी कर्डिले यांच्यासमवेत त्यांचे कार्यकर्ते होते.  

विधानसभेत प्रश्न उपस्थित होणार

नगर जिल्ह्यातील बनावट डिझेलप्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने लागला नाही, तर फडणवीस यांच्या मार्फत हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करू, असा इशाराही कर्डिले यांनी दिला आहे. त्या निमित्ताने हा प्रश्न महाराष्ट्रात गाजणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख