महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कार्यकारिणीत थोरात वगळता नगरला स्थान निरंक - With the exception of Thorat in the Maharashtra Pradesh Congress executive, the city has no place | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कार्यकारिणीत थोरात वगळता नगरला स्थान निरंक

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

नव्या कार्यकारिणीत सहा कार्याध्यक्ष, 10 उपाध्यक्ष, तसेच 37 कार्यकारिणी सदस्य निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये कार्यकारिणी सदस्यांमध्ये बाळासाहेब थोरात यांना संधी देण्यात आली आहे.

नगर : महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आज जाहीर झाली असून, त्यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती दिली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त नगरच्या कोणत्याही नेत्याला स्थान मिळाले नाही.

थोरात प्रदेशाध्यक्ष असताना त्यानिमित्ताने नगरचे स्थान महत्त्वाचे होते. तथापि, आता प्रदेशाध्यक्षपदी विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नगरच्या इतर कोणत्याही नेत्यांना स्थान मिळाले नाही.

नव्या कार्यकारिणीत सहा कार्याध्यक्ष, 10 उपाध्यक्ष, तसेच 37 कार्यकारिणी सदस्य निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये कार्यकारिणी सदस्यांमध्ये बाळासाहेब थोरात यांना संधी देण्यात आली आहे. 

इतर कार्यकारिणी अशी : 

प्रदेशाध्यक्ष - नाना पटोले. 
कार्याध्यक्ष - शिवाजी मोघे, बसवराज पाटील, मोहंमद खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे, प्रनिती शिंदे. 
उपाध्यक्ष - शिरीश चाैधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत कांबळे, कैलास गोरंट्याल, बी. आय. नगराळे, शरद आहेर, एम. एम. शेख, माणिक जगताप.
कार्यकारिणी सदस्य - नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शरद रणपिसे, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, शिवराज पाटील, मुकुल वासनिक, रजणी पाटील, राजीव सातव, अविनाश पांडे, मिलिंद देवरा, विलास मुत्तेमवार, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, के. सी. पाडवी, विजय वडवट्टिवार, डाॅ. नितीन राऊत, वर्षा गायकवाड, सुनील केदार, असलम शेख, यशोमती ठाकूर, अमीत देशमुख, विश्वजीत कदम, सतेज पाटील, वसंत पुरके, सुरेश धानोरकर, रणजीत कांबळे, सुरेश शेट्टी, हुसैन दलवाई, अनंत गाडगीळ, बाबा सिद्दकी, अशिष देशमुख, भालचंद्र मुणगेकर, मुशरफ हुशेन, मनोज जोशी
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख