इंग्लंडवाल्यांनी नगरकरांची धाकधुकी वाढविली ! 25 पैकी 20 निगेटिव्ह - England increased the pressure of the city dwellers! 20 out of 25 negative | Politics Marathi News - Sarkarnama

इंग्लंडवाल्यांनी नगरकरांची धाकधुकी वाढविली ! 25 पैकी 20 निगेटिव्ह

मुरलीधर कराळे
रविवार, 27 डिसेंबर 2020

इंग्लंडहून परतलेल्या नागरिकांनी स्वत:हून महानगरपालिका, जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागास संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे. 

नगर : कोरोना रुग्ण कमी होत असतानाच कोरोनाच्या नवीन विषाणुने धडकी भरली आहे. इंग्लंडमधून जिल्ह्यात आलेल्या 25 प्रवाशांपैकी 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहे. उर्वरित पाच जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू आढळला आहे. या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे.

आरोग्य विभागाकडून या कालावधीत इंग्लंडहून परतलेल्यांची यादी जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात विशेष सर्वेक्षणाअंती 19 जण महानगरपालिका हद्दीतील, तर सहाजण ग्रामीण भागातील आढळून आले आहेत. त्यातील 25 पैकी 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित पाच जणांचे आरटीपीसीआर तपासणीसाठी नमुने घेण्यात आले असून अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

इंग्लंडहून परतलेल्या नागरिकांनी स्वत:हून महानगरपालिका, जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागास संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे. 

दरम्यान, नवीन कोरोनामुळे महाराष्ट्रभर नागरिकांनी याची धास्ती घेतली आहे.
 

हेही वाचा...

माथाडी कामगारांसाठी महत्त्वाच निर्णय

नगर : जिल्ह्यातील नियमित पगार घेणाऱ्या माथाडी कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये अपघात विमा योजनेचा लाभ माथाडी कामगार मंडळाकडून कामगाराच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.

एक लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्चासाठी विमा योजना लागू करण्यात आली आहे, असे जिल्हा हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

घुले म्हणाले, की या योजनेचा लाभ जिल्ह्यातील 2410 नियमित माथाडी कामगारांना दिला जाणार आहे. यापूर्वी माथाडी कामगाराचा मृत्यू झाल्यास 3 लाख रुपये अपघात विमा व 75 हजारापर्यंत वैद्यकीय विमा देण्यात येत होता. परंतु, वाढत्या महागाईचा विचार करता माथाडी मंडळाचे अध्यक्ष सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्ह्यातील माथाडी कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये लाभ तसेच 75 हजार रुपये वैद्यकीय खर्चासाठी अपघाती विमा योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यास कामगार आयुक्त राऊत यांनी मंजुरी दिली. त्यासाठी माथाडी मंडळाचे निरीक्षक सुनील देवकर यांचे सहकार्य लाभले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख