संबंधित लेख


पिंपरी : सैनिकांवरील हल्ल्यांबाबत आनंद व्यक्त करून देशविरोधी भूमिका घेणारे रिपब्लिक चॅनेलचे अर्णव गोस्वामी यांच्या प्रतिमेला पिंपरी चिचंवड शहर...
बुधवार, 20 जानेवारी 2021
युवक काँग्रेसची संघटना बांधणी, विस्तार, गाव तेथे शाखा, प्रशिक्षण शिबिर अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संगमनेर शहर युवक काॅंग्रेसच्यावतीने शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी 7249556666 हा नंबर सुरू करण्यात आला
नगर : जिल्ह्यात युवक काॅंग्रेसचे जाळे प्रत्येक गावात अधिक मजबूत करण्यासाठी काॅंग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली युवक काॅंग्रेसचे पदाधिकारी त्यासाठी सरसावले आहेत. तसेच युवक काॅंग्रेसच्या वतीने हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत प्रत्येक तालुक्यात बैठका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे विशेष मार्गदर्शन राहणार आहे. या मोहीमेचा भाग म्हणून संगमनेरमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितलभैय्या वाबळे, उत्तर कार्यध्यक्ष सुभाष सांगळे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद वर्पे, संगमनेर शहर युवक कॅांग्रेसचे अध्यक्ष निखिल पापडेजा उपस्थित होेत.
युवक काँग्रेसची संघटना बांधणी, विस्तार, गाव तेथे शाखा, प्रशिक्षण शिबिर अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संगमनेर शहर युवक काॅंग्रेसच्या वतीने शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी 7249556666 हा नंबर सुरू करण्यात आला.
समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येणार आहेत. हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याबरोबरच संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न होणार आहे.
काॅंग्रेसला गतवैभव मिळवून देणार
या वेळी वाबळे म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात काँग्रेसला वैभव मिळवून देण्यासाठी युवकांनी अधिकाधिक काम करणे गरजेचे आहे. काँग्रेस हा गोरगरिबांचा पक्ष असून, शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून त्याचा फायदा गरिबांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी काम करावे.