पोपटराव पवारांच्या हिवरेबाजारमध्ये 30 वर्षानंतर निवडणुकीचा आखाडा रंगणार - The election arena will be painted in Hivrebazar after 30 years | Politics Marathi News - Sarkarnama

पोपटराव पवारांच्या हिवरेबाजारमध्ये 30 वर्षानंतर निवडणुकीचा आखाडा रंगणार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

आजी- माजी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य यांनी समेट घडवण्याचा प्रयत्न करूनही त्यांना यात फारशे यश न आल्याने आता गावागावातून दुरंगी तिरंगी लढती रंगणार आहेत.

नगर : 30 वर्षानंतर आदर्शगाव हिवरे बाजार येथे निवडणुकीचा अखाडा रंगणार आहे. 1090 पासून महाराष्ट्र आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हिवरेबाजारची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत होती. या वर्षी या गावात पहिल्यांदाच निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. 

तालुक्‍यातील विविध गावातून विरोधकांना माघारी घेण्यासाठी विविध युक्‍त्या राबविल्या, आजी- माजी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य यांनी समेट घडवण्याचा प्रयत्न करूनही त्यांना यात फारशे यश न आल्याने आता गावागावातून दुरंगी तिरंगी लढती रंगणार आहेत. हिवरेबाजारमध्ये सात प्रभाग आहेत. सर्व प्रभागात लढत निश्चित झाली आहे.

दरम्यान, नगर तालुक्‍यातील बहुतांश गावातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी रात्री उशारापर्यंत सर्व उमेदवारांच्या बैठकी घेण्यासाठी गावातील सामाजिक संघटना, जेष्ठ नागरीक यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कष्ला फळ येते, असे दिसतानाच सकाळी रात्री जमलेला खेळ फिसकटल्याचे चित्र आज तहसील कार्यालयात दिसून येत होते.  

नवनागापूर मधील एका प्रभागातील एका जागा बिनविरोध करण्यासाठी नगर महापिकेचे महापौर, विरोधी पक्षनेत्यासह पाच नगरसेवक आगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होते, मात्र त्या उमेदवाराने अखेरपर्यंत माघार न घेता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख