Eclipse of the corona in the city with the sun! During the day 18 patients were found, Sawedi also finally reached | Sarkarnama

सूर्याबरोबर नगरमध्ये कोरोनाचे ग्रहण ! दिवसभरात 18 रुग्ण आढळले, सावेडीलाही अखेर गाठले

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 जून 2020

नगर जिल्ह्यात आज दिवसभरात 18 रुग्ण आढळले असून, आता एकूण रुग्णांची संख्या 302 झाली आहे. 45 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. 245 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

नगर : शहरातील महत्त्वाचा असलेला सावेडी भाग यापूर्वी कोरोनापासून अलिप्त होता. मात्र आज सायंकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यातील सहा रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले असून, त्यामध्ये नगर शहरातील सावेडी, तोफखाना व सिद्धार्थनगरमध्ये प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळले. तसेच श्रीगोंदे तालुक्यातील तिघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

नगर जिल्ह्यात आज दिवसभरात 18 रुग्ण आढळले असून, आता एकूण रुग्णांची संख्या 302 झाली आहे. 45 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. 245 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

नगर शहरातील सावेडी हा भाग महत्त्वाचा मानला जातो. मुख्य शहरानंतर याच भागात जास्त गजबज असते. सावेडीतील रासनेनगर परिसरात आज 62 वर्षीय पुरुषाचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तसेच शहरातील तोफखाना व सिद्धार्थनगर परिसरातील रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. नगर शहरातील आता जवळजवळ सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. प्रारंभी मुकुंदनगर  परिसरात रुग्ण आढळले होते. त्यानंतर सारसनगर, माळीवाडा, नालेगाव, कल्याणरोड आदी परिसरात रुग्ण आढळले होते. शहराचा उपनगर असलेले बोल्हेगाव फाटा तसेच जवळील गजानन काॅलनी येथेही रुग्ण आढळले होते. त्यामुळे नगर शहरातील सर्वच भागात रुग्ण आढळल्याचे सिद्ध झाले आहे. मध्ये सावेडीचा भाग शिल्लक राहिला होता, तथापि, आज आलेल्या अहवालात या भागातही रुग्ण आढळला आहे.

आज सायंकाळी आलेल्या अहवालात श्रगोंदे तालु्क्यातील तीन रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आहेत. श्रीगोंदे शहरातील 18 वर्षीय युवक, 65 वर्षीय पुरुष तसेच तालुक्यातील बेलवंडी येथील 37 वर्षीय महिलेचे कोरोनाचे अहवाल आज पाॅझिटिव्ह आले. श्रीगोदे तालुका अनेक दिवस कोरोनापासून अलिप्त होता. शेजारील जामखेड, कर्जत तालुक्यातही यापूर्वी कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जामखेडमध्ये तर कोरोनाने धुमाकूळ घातला होता. शेजारील कर्जत तालुक्यातील राशीन येथेही रुग्ण सापडले होते. आता मध्ये असलेल्या श्रीगोंदे तालुक्यातही रुग्ण आढळल्याने नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील बहुतेक सर्वच तालुक्यात रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील उत्तर भागातील संगमनेर, तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ अद्यापही सुरू आहे. तसेच राहाता तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. राहुरी, नेवासे, अकोले आदी तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले होते. अकोले तालुक्यात अजूनही रुग्ण आढळतच आहेत. कोरोनाने जिल्ह्याचा तीनशेचा आकडा पार केला असून, जिल्ह्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.

आज दिवसभरात 18 रुग्ण

दरम्यान, जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालात 12 रुग्ण पाॅझिटिव्ह आले होते. सायंकाळी आलेल्या अहवालात 6 कोरोनाबाधित आढळले. दिवसभरात एकूण 18 रुग्ण बाधित आढळले. त्यामुळे यापूर्वी आलेल्या अहवालात आजच्या दिवसाने उच्चांक गाठला.

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख