या कारणामुळे विद्यामान सरपंचांना मुदतवाढ नाही - Due to this, the term of the existing Sarpanch has not been extended | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

या कारणामुळे विद्यामान सरपंचांना मुदतवाढ नाही

मुरलीधर कराळे
मंगळवार, 21 जुलै 2020

उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाचा निर्णय कायम केला आहे. त्यामुळे त्याच सरपंच किंवा सदस्य यांना मुदतवाढ देऊन मागच्या दाराने आणता येणार नाही, असेही म्हटले आहे.

नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांबाबत आपली भूमिका मांडली. कायद्याचा अभ्यास करून त्यांनी पत्रात विवेचन करीत, ग्रामविकासमंत्र्यांचा गृहपाठच कच्चा असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी हजारे यांना पत्र पाठवून पालकमंत्र्यांकडे प्रशासक नियुक्तीचे अधिकार का दिले, विद्यमान सरपंचांना मुदतवाढ का देता येणार नाही, याबाबत मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचाना मुदत वाढ देण्यास राज्य निवडणूक आयोगाने अक्षेप घेत तशी राज्यघटनेत तरतूद नसल्याचे कळविले आहे. तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाचा निर्णय कायम केला आहे. त्यामुळे त्याच सरपंच किंवा सदस्य यांना मुदतवाढ देऊन मागच्या दाराने आणता येणार नाही, असेही म्हटले आहे.

सध्याच्या कोरोनाच्या महामारीत निवडणुका घेणे शक्य नाही व ग्रापंचायतीवर प्रशासक नेमण्यासाठी पुरेशा प्रमाणात विस्तार अधिकारी नसल्याने असा निर्णय घेण्यात आला असल्याचा निर्वाळ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जेष्ठ हजारे यांना पत्र पाठवून दिला आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या  कोरोनाच्या महामारीत व या अभतपूर्व उद्भवलेल्या परिस्थितीत निवडणूक आयोगाला निवडणूक घेणे शक्य नाही त्या मुळे हा निर्णय घेण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे.

ग्रामपंचायत अधिनियमात निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षाच्या कालावधीत सरपंचावर अविश्वास आला किंवा सर्वांनी राजीनामे दिले, तर किंवा न्यायालयाने निवडणूक बेकायदेशीर ठरविली, तर प्रशातर तेथे प्रशासक नेमण्याची अधिनियमात तरतूद आहे. परंतु पाच  वर्ष कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूका होवू न शकल्यास काय करावे यासंबंधी अधिनियमात तरतूद नाही. म्हणून अधिनियमात शासनाने दुरूस्ती करून आणी-बाणी किंवा महामारीच्या परिस्थितीत निवडणूक घेता येणे शक्य नसल्यास योग्य व्यक्तीची निवड प्रशासक म्हणून करता येईल, असा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडून पाठविला व त्यांच्या मान्यतेनंतर व  राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर हा अध्यादेश काढला असल्याचे पत्रात म्हटले आहे.

पालकमंत्र्यांना मीच कळविले

राज्यातील 14 हजार 234  ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या आहेत. तेथे  प्रशासक व सरकरचा प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतो व जिल्ह्याच्या विविध समित्यांवर सदस्य असतो. पालकमंत्री त्या जिल्हयातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असतो. जिल्हयाच्या नियोजन मंडळाचाही तो अध्यक्ष असतो व जिल्हयात उद्भविलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासन व सरकार यांचा दुवा म्हणून काम करतो. पालकमंत्र्यांना मी माझ्या स्वत:च्या सहीने पत्र लिहून ग्रामपंचायतीमध्ये सध्याच्या सरपंचाच्या आरक्षणानिहाय गावातील कार्यक्षम व चांगल्या व्यक्तीची निवड करावी, असे कळविले आहे.

छातीवर दगड ठेवून घेतला हा निर्णय

सध्याच्या महामारीच्या परस्थीतीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार व गावगाडा सुरळीत चालावा, या साठी छातीवर दगड ठेवून हा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे. यात कुठल्याही राजकीय हेतु नसल्याचा उल्लेख करून लोकशाही मार्गाने पालकमंत्र्याच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योग्य कार्यक्षम व्यक्तीची निवड करावी, हीच अपेक्षा आहे. तसेच या निर्णयाच्या विरोधात मुंबई, नागपूर व औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या बाबत उच्च न्यालयाचा जोकाही निर्णय येईल त्याचे स्वागत केले जाईल. आपल्या भेटीच्या वेळी या बाबत मी सविस्तर माहीती देई, असेही पत्रात शेवटी मुश्रीफ यांनी म्हटले आहे

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख