थोरातांची कन्या डाॅ. जयश्री, आमदार डावखरे यांच्या नावे बनावट अकाउंट करून मागितले पैसे - Dr. Thorat's daughter. Money demanded through fake account in the name of Jayashree, MLA Davkhare | Politics Marathi News - Sarkarnama

थोरातांची कन्या डाॅ. जयश्री, आमदार डावखरे यांच्या नावे बनावट अकाउंट करून मागितले पैसे

मुरलीधर कराळे
गुरुवार, 4 मार्च 2021

नेत्यांच्या नावे बनावट सोशल मीडियाचे अकाउंट ओपण करून गैरकारभार केल्याची उदाहरणे आहेत. आता मात्र नेत्यांच्या मुलीच्या नावे बनावट फेसबूक अकाउंट ओपण करून पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

नगर : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डाॅ. जयश्री थोरात यांच्या नावाने बनावट फेसबूक अकाउंट ओपण करून अज्ञात व्यक्तीने अनेकांना पैसे मागितले आहेत. असाच प्रकार भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्याबाबतही झाला आहे. त्यांच्या नावे बनाटव व्हाॅटस अॅप अकाउंट तयार करून पैसे मागितले जात आहेत.

हेही वाचा... घुलेंच्या शर्यतीत शेळकेंची एन्ट्री

नेत्यांच्या नावे बनावट सोशल मीडियाचे अकाउंट ओपण करून गैरकारभार केल्याची उदाहरणे आहेत. आता मात्र नेत्यांच्या मुलीच्या नावे बनावट फेसबूक अकाउंट ओपण करून पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

थोरात यांची कन्या डाॅ. जयश्री यांच्या नावे हे अकाउंट ओपण करून त्याद्वारे अनेकांना पैशाची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे मंत्री थोरात यांच्यासह डाॅ. जयश्री यांचा फोटो या अकाउंटवर वापरण्यात आला आहे. याबाबत सिद्धार्थ थोरात यांनी संगमनेर पोलिस ठाण्याच अर्ज दिला असून, संबंधित व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.

निरंजन डावखरे यांनाही तोच अनुभवआमदार निरंजन डावखरे यांनीही सोशल मीडियावर मेजेस टाकून आपल्या नावाने बनावट व्हाॅटस अॅप अकाउंट अज्ञात व्यक्तीने ओपण करून त्याद्वारे पैसे मागितले असल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये संबंधित नंबर दिला असून, त्यावर कोणीही व्यवहार करू नये, असे डावखरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकाराची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे.

 

हेही वाचा...

सरकारने स्वतःच्या महसूलवर सोडले पाणी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या महसूल आणि नगरविकास विभागातच  कोन बनेगा करोडोपतीची स्पर्धा सुरू आहे.बिल्डर लाॅबीच्या हिताच्या  निर्णयाचा महाप्रताप करून  सरकारने  स्वतःच्याच महसूलावर पाणी सोडले  असल्याची घणाघाती टीका भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

हेही वाचा.. त्यांनी घेतला मलिदा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेताना आमदार विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. कोव्हीडच्या नावाखाली सराकार आपली निष्क्रियता लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करुन सरकार फक्त जनतेला मदत करीत असल्याचा खोटा आव आणत असल्याचे सांगितले.

कोव्हीड नंतर महससूलात  वाढ व्हावी म्हणून सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये तीन आणि दोन टक्क्यांची आणि रेडीरेकनरच्या दरात कपात केली. नगर विकास विभागाने सुध्दा प्रिमियमचे दर खाली आणून केवळ मुंबईतील बिल्डर लाॅबीच्या हिताचे निर्णय केले. विकासाचे हित फक्त सरकारने पाहिले. यामध्ये सामान्य माणसाला किती लाभ झाला, याची शंका उपस्थित केली. सरकारने हे निर्णय मात्र राज्यातील इतर मोठ्या शहरांना का लागू केले नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून सरकारच्या या निर्णयाचा नेमका फायदा कोणाला झाला. घरे किती सामान्य माणसांना मिळाली आणि राज्याच्या तिजोरीत किती महसूल जमा झाला, याची सरकराने श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आमदार विखे पाटील यांनी केली.
 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख